Breaking News
Home / मराठी तडका / ​जय जय स्वामी समर्थ मालिकेतील हा अभिनेता झाला विवाहबद्ध….

​जय जय स्वामी समर्थ मालिकेतील हा अभिनेता झाला विवाहबद्ध….

कलर्स मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही अध्यात्मिक मालिका प्रसारित केली जात आहे. कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. नुकताच मालिकेतील कलाकार अनुज ठाकरे विवाहबद्ध झाला आहे त्यानिमित्ताने मालिकेतील त्याच्या सहकलाकारांनी नागपूरला धाव घेतली होती. अभिनेता अनुज ठाकरे याने अभिनेत्री अश्विनी गोरले हिच्यासोबत रविवारी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली आहे. नागपूर येथे अनुज आणि अश्विनी यांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला होता. त्यांच्या या लग्नाला अंकुर वाढावे, विजया बाबर, पूजा रायबागी, जान्हवी किल्लेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती.

ajun thakare ashwini gorale wedding photos
ajun thakare ashwini gorale wedding photos

अनुज ठाकरे हा मूळचा विदर्भातील चांदुर रेल्वे या गावचा. शाळेत असल्यापासूनच तो बालनाट्यातून सहभाग घ्यायचा. नाट्यशास्त्रातुन त्याने पदवीचे शिक्षण घेतले. नाट्यशास्त्रात संगीत विषय शिकवला जातो त्यामुळे पुढे बाजीराव मस्तानी, नवा गडी नवं राज्य, आधी बसू मग बोलू या नाटकासाठी म्युजिक ऑपरेटिंगच काम त्याने केलं. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धां मध्ये सहभाग घेतला. मुंबईतला प्रवास मात्र त्याचा खूपच कठीण गेला. दोन ते तीन मित्रांसोबत रूम शेअर करून राहावे लागत. पुरेशा पैशाअभावी मित्राने आणून दिलेली मॅगी खाऊन पूर्ण दिवस काढावा लागे. एवढेच नाही तर कधी कधी पैसे जवळ नसले की अंधेरी ते गोरेगाव हा प्रवास पायी करावा लागे. हाच खडतर प्रवास भोगत असताना स्टार प्रवाह वाहिनीवर नंबर १ या मालिकेत पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन या लोकप्रिय मालिकेतून त्याने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. इथे मात्र अनुजला हळूहळू लोकप्रियता मिळू लागली. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया या हिंदि मालिकेत छोट्या छोट्या भूमिका साकारल्या.

ajun thakare weds ashwini gorale
ajun thakare weds ashwini gorale

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत “सुमुख” हे अफलातून पात्र साकारण्याची नामी संधी त्याला मिळाली. दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसवून स्वतःची फजिती करून घेणारा सुमुख हा विनोदी खलनायक प्रेक्षकांना देखील खूपच भावला. अनुज आता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. त्याने साकारलेल्या सुमुख पत्राचे खूप कौतुक देखील होत आहे. अनुजची पत्नी अश्विनी ही देखील अभिनेत्री आहे. अश्विनीने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे धडे गिरवले असून, प्रायोगिक नाटकात तिने सहभाग दर्शवला आहे. अश्विनी आणि अनुज ठाकरे यांना आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

actor ajun thakare wedding
actor ajun thakare wedding

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.