Breaking News
Home / मालिका / ​तेजश्री प्रधान दिसणार नव्या भूमिकेत..

​तेजश्री प्रधान दिसणार नव्या भूमिकेत..

टीव्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी कथेत काही ना काही टवीस्ट आणावाच लागतो. मालिकेला रंजक वळण देण्यासाठी हिट फॉर्म्युला म्हणजे मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री. कथेतील उत्सुकता वाढवण्यासाठी गेल्या काही दिवसांत सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होताना दिसत आहे. असाच एक ट्रॅक जाऊ नको दूर बाबा या मालिकेत पहायला मिळणार आहे. या ट्रॅकची चर्चा सुरू झाली आहे ती छोटया आणि मोठया पडद्यावरील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या नावामुळे. तेजश्रीच्या चाहत्यांसाठी ही गुड न्यूज असून बऱ्याच दिवसांनी तेजश्रीला मालिकेत पहायला उत्सुक असलेल्या तिच्या चाहत्यांसाठी ही ट्रिट आहे. मोजक्या पण लोकप्रिय मालिकांमधील एक हवाहवासा वाटणारा चेहरा म्हणून तेजश्रीचा मोठा फॅन क्लब आहे.

jau nako dur baba serial
jau nako dur baba serial

अग्गंबाई सासूबाई या मालिकेच्या पहिल्या पर्वाने निरोप घेतल्यानंतर तेजश्री छोट्या पडद्यापासून लांबच होती. ती पुन्हा अभिनय करताना कधी पहायला मिळणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता चाहत्यांनी प्रतीक्षा संपली असून तेजश्री जाऊ नको दूर बाबा या मालिकेत एन्ट्री करणार आहे. तेजश्रीची एन्ट्री असलेला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून या प्रोमोला या मालिकेच्या प्रेक्षकांची तसेच तेजश्रीच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे. जाऊ नको दूर बाबा ही मालिका सध्या खूपच रंजक प्रसंगांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. प्रिया, अर्पिता आणि युवराज यांच्या नात्यात सध्या जो काही गोंधळ सुरू आहे त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे.

tejashri pradhan
tejashri pradhan

खरं तर युवराज आणि अर्पिता यांचं एकमेकांवर प्रेम असताना अर्पिताचे बाबा प्रिया आणि युवराजचं लग्न ठरवण्यासाठी पुढाकार घेतात. अर्पिताला तिच्या बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नसल्याने ती तिच्या प्रेमाचा त्याग करायचं ठरवते. आणि प्रियासोबत युवराजचं नातं स्वीकारायला तयार होते. मालिकेतील याच वळणावर तेजश्री प्रधानची एन्ट्री होणार आहे. युवराज आणि प्रियाच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात तेजश्री आणि पुष्कर जोग हजेरी लावतात असे दाखवण्यात आले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये तेजश्रीची नेमकी भूमिका किंवा तिचे पात्र काय आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण यामध्ये अर्पिता आणि तेजश्री यांच्यात संवाद दाखवला आहे. तेजश्री अर्पिताला तिच्या आणि युवराजच्या प्रेमाची जाणीव करून देते असं दाखवलं आहे.

तर पुष्कर आणि युवराज यांच्या संवादातही युवराजला प्रियासोबतच्या नात्याचा आनंद झालेला दिसत नाही असं पुष्कर सांगताना दिसत आहे. त्यामुळे तेजश्रीची एन्ट्री ही अर्पिता आणि युवराज यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी होणार हे तर पक्कं आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या तेजश्री प्रधानने सिनेमापासून अभिनयाची सुरूवात केली. अग्गंबाई सासूबाई या मालिकेच्या पहिल्या पर्वात तिने साकारलेली शुभ्राची भूमिका खूप गाजली. पण याच मालिकेच्या दुसऱ्या पर्वात काम करण्यास तिने नकार दिला. त्यानंतर तेजश्री नव्या रूपात कधी पहायला मिळणार याची चाहते वाट पाहत होते. जाऊ नको दूर बाबा या मालिकेच्या प्रोमोत तेजश्री दिसल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.