Breaking News
Home / मराठी तडका / हृताच्या मेहेंदी आणि हळदी सोहळ्याचे न पाहिलेले खास फोटो

हृताच्या मेहेंदी आणि हळदी सोहळ्याचे न पाहिलेले खास फोटो

कुठलाही गाजावाजा न करता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नायिका म्हणजेच हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला मराठी तसेच हिंदी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या हृता मन उडू उडू झालं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील कलाकार पूर्णिमा तळवळकर, ऋतुराज फडके, रीना अगरवाल, विनम्र बाभळ यांनी लग्नाला उपस्थिती लावली होती. तर तृष्णा चंद्रात्रे, प्रिया बापट, उमेश कामत, रेवती लेले, सुयश टिळक, आयुषी भावे अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.

hruta durgule haladi function
hruta durgule haladi function

हृता दुर्गुळे मे महिन्यात लग्न करणार अशी चर्चा प्रसार माध्यमात रंगली होती मात्र लग्नाची तारीख जाहीर करणे तिने टाळले होते. त्यामुळे काल अचानक तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्या चाहत्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया देऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लग्नातील काही खास व्हिडीओ हृता आणि प्रतिकने चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळाले. उपस्थित कलाकारांनी देखील हृताच्या लग्नातले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हृता गेल्या काही दिवसात मालिका आणि नाटकांमधून व्यस्त होती. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा दौरा आटोपल्यानंतर हृताच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली.

hruta durgule haldi
hruta durgule haldi

गेल्या दोन दिवसांपासूनच तिच्या घरी ही लगबग सुरू झाली होती. त्याचा एक खास व्हिडीओ हृताची खास मैत्रीण आणि मालिका अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे हिने नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओत हृताच्या घरी ग्रहमख पूजन पार पडले. त्यानंतर मेहेंदी तसेच हळदीचे काही खास क्षण साजरे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन दिवस अगोदर हृताच्या घरी अगदी साध्या पद्धतीने मेहेंदीचा सोहळा पार पडला. त्यानंतर हृताने हळदी सोहळ्यात पिवळ्या रंगाची साडी नेसलेली पाहायला मिळाली. हळदीला उपस्थित राहता न आल्याने तृष्णाने हृताला व्हिडीओ कॉल करून तिच्याशी संवाद साधला. लग्न मंडपात हृता दाखल झाली त्यावेळी ती खूपच भावुक झालेली पाहायला मिळाली.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.