Breaking News
Home / मालिका / झी मराठीवर सुरू होणार नवी मालिका.. हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत
siddharth khirid pooja katurde
siddharth khirid pooja katurde

झी मराठीवर सुरू होणार नवी मालिका.. हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

झी मराठी वाहिनीवर नवीन मालिकांचा बोलबाला सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. अर्थात टीआरपीच्या स्पर्धेत स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर राहिली आहे. झी मराठी वाहिनी नव्या दमाच्या मालिका आणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करताना दिसत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यावर भर दिला. फक्त मालिकेच्या वेळेत बदल झाल्याने आता कमी टीआरपी मिळू लागला आहे. येत्या ७ नोव्हेंबर पासून झी मराठी वाहिनीवर आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. नवीन मालिकेमुळे तू तेव्हा तशी या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

hrudayi preet jagate new serial
hrudayi preet jagate new serial

रात्री ८ वाजता प्रक्षेपित केली जाणारी तू तेव्हा तशी ही मालिका आता रात्री ११ वाजता पहायला मिळणार आहे. या वेळेवर ‘हृदयी प्रीत जागते’ ही नवीन मालिका प्रसारित केली जाणार आहे. मंदार देवस्थळी मालिकेचे दिग्दर्शन करणार असल्याने प्रेक्षकांनी स्वागत केले आहे. सिद्धार्थ खिरीड आणि पूजा कातूर्डे मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. पूर्णिमा तळवळकर सोबत आणखी बरेचसे जाणते कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. प्रमुख भूमिका साकारण्याचे आपलं स्वप्न सत्यात उतरताना पाहून सिद्धार्थ खिरीड खूप भावुक झाला. झी मराठी सारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळाल्याने त्याने आनंद व्यक्त केला आहे. पूजाला प्रमुख नायिकेची भूमिका मिळाल्याने ती देखील आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे.

siddharth khirid pooja katurde
siddharth khirid pooja katurde

सिद्धार्थ खिरीड याने जाडूबाई जोरात या मालिकेतून कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. झी युवा वरील फ्रेशर्स, सोनी मराठी वरील एक होती राजकन्या तसेच स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेत काम केले. सिध्दार्थला डान्सची विशेष आवड आहे. पूजा कातूर्डे हिने देखील मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नाटकांमधून काम करत असताना पूजाला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस मालिकेत पूजाने सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. हृदयी प्रीत जागते या नवीन मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली आहे. सिद्धार्थ पॉप स्टार; तर पूजा शास्त्रीय गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांच्या या आगळ्या वेगळ्या प्रेम कहाणीला प्रेक्षक नक्कीच पसंती देतील अशी आशा आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.