Breaking News
Home / जरा हटके / अविनाश नारकर सोबत झळकलेली ही बालकलाकार आज आहे प्रसिद्ध व्यक्ती.. ​तब्बल २५ वर्षानंतर आता दिसते अशी
hasri movie mansi avinash narkar
hasri movie mansi avinash narkar

अविनाश नारकर सोबत झळकलेली ही बालकलाकार आज आहे प्रसिद्ध व्यक्ती.. ​तब्बल २५ वर्षानंतर आता दिसते अशी

१९९७ साली ‘हसरी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अविनाश नारकर, दिलीप कुलकर्णी, नीना कुलकर्णी, सुरेखा कुडची, ए के हंगल हे कलाकार झळकले होते तर मध्यवर्ती भूमिकेत बालकलाकार मानसी आमडेकर झळकली होती. या चित्रपटाला १९९७-९८ सालचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुभाष फडके, उत्कृष्ट सहाय्यक कलाकार म्हणून अविनाश नारकर तसेच उत्कृष्ट बालकलाकार म्हणून मानसी आमडेकर असे एकूण चार पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते. मानसीने या चित्रपटात हसरीची भूमिका साकारली होती. हसरीचा निरागसपणा मानसीने तीच्या अभिनयातून सुरेख वठविला होता.

hasri movie mansi avinash narkar
hasri movie mansi avinash narkar

या चित्रपटानंतर मानसी आणखी एका मराठी चित्रपटात झळकली मात्र त्यानंतर ती फारशी चर्चेत राहिली नाही. परंतु मानसी आता रेडिओ जॉकी तसेच दूरदर्शन वाहिनीवरील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून परिचयाचा बनला आहे. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. हसरी चित्रपटानंतर मानसी ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटात झळकली होती. मानसीचे संपुर्ण बालपण गेले ते ठाण्यातच. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुल तसेच विनायक गणेश वझे कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. एक समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ अशीही तिची ओळख आहे. कॉलेजमध्ये असताना मधल्या काळात मानसीने राज्य नाट्य स्पर्धामधून सहभाग दर्शविला होता.

mansi amdekar
mansi amdekar

पुढे अभिनय क्षेत्रात न येता मानसीने लेखिका, निवेदिका, सुत्रसंचालिका, मुलाखतकार, रेडिओ जॉकी अशा विविध भूमिका साकारणे अधिक पसंत केले आहे. सह्याद्री वाहिनीवरील ‘आपला महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे ती निवेदन करताना दिसते. तर कधी आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करते तर कधी वृत्तपत्रात तिचे लेख छापून आलेले पाहायला मिळतात. एवढेच नाही तर एफ एम गोल्ड या रेडिओ चॅनलवर ती रेडिओ जॉकी बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली आहे. गेल्या ७ वर्षांपासून मानसी रेडिओ जॉकी म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ठाण्यात पार पडलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तिने सूत्रसंचालन केले आहे.

त्यामुळे मानसी आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी तिचा विविध क्षेत्रातला हा दांडगा अनुभव तिला प्रसिद्धी मिळवून देताना दिसत आहे. एक बालकलाकार म्हणून एक दोन चित्रपटात झळकलेली मानसी आता विविध क्षेत्राची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहे. हसरी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या चित्रपटाची आठवण सांगताना मानसी म्हणते की, ‘ज्या कलाकृतीने माझ्यातल्या कलेची ओळख मलाच करून दिली. जी साकारतानाच्या वाटचालीत, अगदी लहान वयात खूप काही शिकण्याची संधी मिळाली आणि अविस्मरणीय असे अनेक अनुभव! ती कलाकृती “हसरी” यंदा २५ वर्षांची झाली!’

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.