Breaking News
Home / मालिका / ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. पत्नीही आहे अभिनेत्री

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. पत्नीही आहे अभिनेत्री

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेला ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, लीना भागवत, मंगेश कदम, नम्रता प्रधान, सुप्रिया पाठारे, शरद पोंक्षे, अतुल तोडणकर अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. मालिकेतील कुकी गॅंग आणि अप्पूचा अल्लडपणा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. मालिकेतील विठूबाबा आणि सुवा आई हे दोघेही रिअल लाईफ कपल रील लाईफमध्येही एकत्र काम करताना दिसत आहेत. या दोघांनी काही दिवसांपूर्वीच नवीन घर खरेदी केले होते त्यामुळे त्यांच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. मालिकेतील अप्पू प्रेक्षकांना खूपच भावली आहे. मात्र ती अल्लड नसून आता कानिटकर कुटुंबाला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहे.

guru divekar veena jagtap
guru divekar veena jagtap

नुकतेच मालिकेत अवंतिकाची एन्ट्री करण्यात आली होती. अप्पूने पुढाकार घेऊन अवंतिकाची भेट घडवून आणली. अवंतिकाची भूमिका अ भिनेत्री वीणा जगतापने साकारली आहे. आता लवकरच या मालिकेत अवंतिकाच्या नवऱ्याची एन्ट्री होणार आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेता गुरू दिवेकर याने. गुरूची पत्नी मधुरा जोशी ही देखील मालिका अभिनेत्री आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत गुरु आणि मधुराने गांधार आणि दिशा या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या मालिकेमुळेच हे दोघे एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यानंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. गुरुने शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत हर्षद हि भूमिका साकारली होती, तर मधुरा ने सोनी मराठीवरील श्रीमंता घरची सून या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका निभावली.

guru divekar wife madhuri joshi
guru divekar wife madhuri joshi

मधुरा सध्या स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत काम करत आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत गुरूने विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. पत्नी सोबत गुरूची देखील स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून एन्ट्री होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही भूमिका तितकीच महत्वाची आहे. अवंतिका आणि तिचा नवरा मिळून कानिटकर कुटुंबात येऊन आता मालिकेत कोणते नवे ट्विस्ट आणणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अवंतिका आणि गुरूच्या येण्याने मालिकेला एक वेगळे वळण लागले आहे. अप्पू आणि शशांकच्या संसारात हे दोघे वादळ आणणार की त्यांना सहकार्य करणार हे येत्या दिवसातच स्पष्ट होईल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.