Breaking News
Gudi Padwa Hardik Shubhechha
Gudi Padwa Hardik Shubhechha
Home / जरा हटके / कलाकारांनी उत्साहात साजरा केला गुढी पाडवा सण

कलाकारांनी उत्साहात साजरा केला गुढी पाडवा सण

महाराष्टात खास करून मुंबईमधील डोंबिवली, गिरगाव, दादर, जुहू अशा बऱ्याच भागात पाडवा मिरवणुकी काढल्या जातात. ढोल ताशा पथक, मराठमोळ्या नववारी मध्ये सजलेल्या तरुणी, रंगबेरंगी वेशभूषेतील लहान कलाकार, रांगोळ्या, फुलांच्या आरास खास करून पाहायला मिळते. या मुरवणुकीत सुने श्रुष्टीतील कलाकार विशेष हजेरी लावतात.

गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच संवत्सराचा मांगल्याचा पहिला शुभ दिवस. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची शून्यापासून निर्मिती केली त्यामुळे हा सण निर्मितीचा देखील आहे. चैत्राच्या दिवसांमध्ये निर्सग नवीन पालवीने फुललेला असतो, सर्वत्र आल्हाददायक उत्साह उमलत असतो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे.

जम्मू कश्मीर मध्ये नवरेह, पंजाब मध्ये बैसाखी, उत्तर भारतातील हिमाचल आणि शेजारील राज्यांत नवरात्र उत्सव, गुजरात मध्ये संवत्सर पाडवो किंवा चैत्र प्रतिपदा, उत्तरप्रदेश आणि झारखंड मध्ये शीतल,  महाराष्ट्र आणि कोकणात गुढी पाडवा, कर्नाटक आन्धप्रदेश तसेच संपूर्ण दक्षिण भारतात उगडी, केरळ मध्ये विशू, तामिळनाडू मध्ये पुथांडू,  बंगाल आणि बिहार मध्ये चैत्र नबमी पूजा किंवा नबा वर्षा, तसेच मणिपूर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सजीबो नॉनग्मा पांगमा चेरिओबा किंवा बिहू अशा विविध नावाने साजरा केला जातो.

मराठी भाषिकांच्या दृष्टीने गुढी पाडव्याला आणखी अनन्य साधारण महत्व आहे की गुढी पाडव्याला पंचांगपूजन देखील केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी ही पावित्र्य, भरभराटी आणि समृद्धीचे प्रतीक असते. नवीन व्यवसाय प्रारंभ, वस्तू खरेदी, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण अलंकार खरेदी अशा गोष्टींची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. पुढच्या वर्षाचे भविष्य जाणून घेण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी अशा शुभकार्याचा संकल्प करण्यासाठी पाडव्याचा दिवस योजला जातो.

प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून चैत्र शुद्ध प्रतिपदेला अयोध्या नगरीत प्रवेश केला. शालिवहन शकाचा प्रारंभ चैत्र प्रतिपदा दिवसापासूनच होतो.

शालिवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही कथा प्रचलित आहे. शालिवहन नावाच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यांना जिवंत करून; त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका सर्वश्रुत आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केली जी सर्व पंचाग आणि शुभ मुहूर्त साठी आजही वापरली जाते.

अशा या पवित्र दिवशी घरोघरी गुढ्या-तोरणे उभारतात. मंगलस्नान करून कडुलिंबाची पाने, लवण, जिरे, मिरे, हिंग आणि ओवा यांचा एकत्रित प्रसाद ग्रहण केला असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, अशी समजूत आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, म्हणून ब्रह्मपूजा हा या दिवशी महत्त्वाचा विधी करतात. बांबूच्या टोकास रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर चांदी सोन्याचे वा पितळेचे भांडे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी व फुलांची माळ बांधतात आणि भक्तिभावाने ती सजवलेली गुढी मांगल्याचे प्रतीक म्हणून दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढी पाडवा’ म्हटले जाते. पुराणांत या दिवशी बरेच विधी सांगितले आहेत.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *