Breaking News
Home / मराठी तडका / एका चित्रपटानंतर गायब झालेली ही अभिनेत्री पुन्हा झळकणार प्रमुख भूमिकेत
gayatrai jadhav baban movie
gayatrai jadhav baban movie

एका चित्रपटानंतर गायब झालेली ही अभिनेत्री पुन्हा झळकणार प्रमुख भूमिकेत

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित बबन हा मराठी चित्रपट २०१८ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. साज ह्यो तुझा, जगण्याला पंख फुटले, गोडी मधाची, मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं ही चित्रपटातील सर्वच गाण्यांना प्रेक्षकांकडून तुफान लोकप्रियता मिळाली होती. या एकाच चित्रपटामुळे गायत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. आज लग्न करून गायत्री घर संसारात रमली असली तरी आता एका आगामी चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुढील महिन्यात २ डिसेंबर रोजी एकदम कडक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

gayatrai jadhav baban movie
gayatrai jadhav baban movie

चित्रपटात गायत्री जाधव सह पार्थ भालेराव, सैराट फेम तानाजी गलगुंडे, अरबाज शेख. भाग्यश्री मोटे, चिन्मय संत, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनावणे हे कलाकार कॉलेज लाईफ अनुभवणाऱ्या तरुणांचा प्रवास चित्रपटातून उलगडणार आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी चित्रपटाच्या अभिनेत्रीची अर्धवट झलक प्रेक्षकांच्या समोर आली होती. त्यावरून ही नायिका कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावरचा पडदा आता हटला असून भाग्यश्री मोटे ही भूमिका निभावणार असल्याचे समजले होते. भाग्यश्री सोबत गायत्री जाधव या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. गायत्रीचा हा तिसरा चित्रपट असला तरी बबनमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

gayatri jadhav
gayatri jadhav

बबन चित्रपटात तिची निवड ओघानेच झाली होती असे म्हणायला हरकत नाही. बहुतेक चित्रपटाच्या कलाकारांची निवड ही ऑडिशनमधून केली जाते. मात्र गायत्री जाधव या बाबतीत वेगळी ठरली; कारण गायत्री तिच्या आई सोबत चित्रपट पाहायला चालली होती. पुण्यातील रस्त्याने जात असताना दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची नजर गायत्रीवर पडली. आणि बबन चित्रपटाच्या नायिकेसाठी तिची निवड करण्यात आली. बबन चित्रपटाने आणि त्यातील गाण्याने गायत्रीला अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली. या चित्रपटाखेरीज गायत्री आणखी एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. हा चित्रपट होता राजकुमार; १६ जुलै २०२१ रोजी युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला होता. युट्युबच्या माध्यमातून चित्रपट प्रदर्शित होणं असं इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं पाहायला मिळालं.

थिएटर बंद असल्या कारणाने केवळ मराठी चित्रपट पुढे यावा याच हेतूने चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला होता. राजकुमार या चित्रपटात गायत्री जाधव आणि भाऊसाहेब शिंदे यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकली. प्रवीण तरडे, देविका दफतरदार, बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांचीही साथ चित्रपटाला मिळाली होती. युट्युबच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. एकदम कडक आगामी चित्रपटातील नव्या भूमिकेसाठी गायत्री खूपच उत्सुक आहे. या चित्रपटातील कलाकार आणि संपुर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.