लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिने काही दिवसांपूर्वीच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही स्वतःचे नाव व्हावे या हेतूने तिने Ehaa’s creations या नावाने तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. स्वानंदी बेर्डे हिने ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. ह्या विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अभिनय क्षेत्रा सोबतच ती आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड मार्केटमध्ये आणत आहे. या क्लॉथ ब्रँडमध्ये एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरिअल्स, दुपट्टा आणि ज्वेलरीच्या विविध प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

स्वानंदि बेर्डे आणि सायली गवळी या दोघीनि मिळून एहाज क्रिएशनचा हा व्यवसाय थाटला आहे. याच नावाने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून त्यावर साड्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील. शिवाय Ehaa’s creations च पहिलं वहिलं प्रदर्शन आता लवकरच पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. येत्या ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या ४ दिवसांच्या कालावधीत सुर्यदत्ता कॉलेज , बावधन, पुणे येथे हे प्रदर्शन पुणेकरांना पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहे. घे भरारी या प्रयोजकाअंतर्गत हे प्रदर्शन बावधन परिसरात भरणार आहे. ही माहिती नुकतीच स्वानंदीची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी इंस्टाग्रामवरून दिली आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. शिवाय तुम्हाला त्यातलं काही आवडलं तर नक्की खरेदी करा आणि तिथे आल्यावर मला देखील नक्की भेटा अशी एक नम्र विनंती त्यांनी केली आहे. तेव्हा पुणेकरांनो तुम्ही हे प्रदर्शन पाहायला सूर्यदत्ता कॉलेजमध्ये नक्की जाणार ना!..
