Breaking News
Home / जरा हटके / ​देवमाणूस मालिकेतील हा अभिनेता आहे अभिनेत्रीच्या प्रेमात.. मालिकेत काम करताना जुळलं प्रेम

​देवमाणूस मालिकेतील हा अभिनेता आहे अभिनेत्रीच्या प्रेमात.. मालिकेत काम करताना जुळलं प्रेम

झी मराठी वाहिनीवर देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. मात्र या मालिकेचा शेवट अर्धवट दाखवल्याने या मालिकेचा सिकवल असलेली “देवमाणूस २” ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे असले तरी या मालिकेत डॉ अजित कुमारच्या मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता किरण गायकवाड पुन्हा एकदा हीच भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मालिकेतील सरू आज्जी, टोन्या, विजय, बाबू, नाम्या, बज्या, मंगल ही पात्र पुन्हा एकदा मालिकेतून दिसणार की नाही किंवा पात्रात बदल केले जाणार हे येत्या काही दिवसातच समजेल.

actor eknath gite and trishaa kamlakar
actor eknath gite and trishaa kamlakar

मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने आणि ह्यात डॉक्टरला शिक्षा होणार असल्याने याबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. तूर्तास देवमाणूस मालिकेतील विजय शिंदे ही भूमिका साकारणारा अभिनेता एकनाथ गीते हा अभिनेत्रीच्या प्रेमात आहे आणि नुकतीच त्याने तिच्यासोबत ३ वर्षे रिलेशनमध्ये असल्याची कबुली देखील दिली आहे. अभिनेता एकनाथ गीते याने देवमाणूस मालिकेत विजयची भूमिका निभावली होती या भूमिकेमुळे एकनाथला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. एकनाथ गीते हा मूळचा परभणीचा जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचं गाव. एकनाथला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात तो नेहमी सहभागी व्हायचा. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर ऑफ थिएटर्स आर्टस् केलं. यातून अनेक नाटकात त्याला काम करता आलं. देवमाणूस या मालिकेअगोदर कलर्स मराठीवरील जागते रहो महाराष्ट्र, मेरे साई हिंदी मालिका, तांडव मराठी चित्रपट, झी युवा वरील तू अशी जवळी रहा, स्टार प्रवाहवरील प्रेमा तुझा रंग कसा, श्री गुरुदेव दत्त, फक्त मराठी देव पावला, घेतला वसा टाकू नको अशा चित्रपट आणि अनेक मालिकांमधून एकनाथला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.

eknath gite love trishaa kamlakar
eknath gite love trishaa kamlakar

प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत काम करत असताना सहनायिकेसोबत त्याचे प्रेम जुळले ही नायिका आहे त्रिशा कमलाकर. त्रिशा कमलाकर ही मॉडेल, अभिनेत्री आहे तसेच तिने शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. तुझ्या माझ्या पिरमाचा बॅनर लागला, मैत्रीची दोस्ती, शिकायत अशा व्हिडिओ सॉंगमधून ती झळकली आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटात देखील तिला अभिनयाची संधी मिळाली होती. याशिवाय स्टार प्रवाहवरील प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत तिने महत्वाची भूमिका निभावली होती. याच मालिकेत काम करत असताना एकनाथ गीते आणि त्रिशा यांच्यात प्रेम जुळून आले. २०१८ ते २०२१ आपण एकत्र आहोत अशी प्रेमाची कबुली देत या दोघांनी एकमेकांसोबत असलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या अगोदरही दोघांचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले होते त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र आता अधिकृतपणे प्रेमाची जाहीर कबुली देताच त्यांना चाहत्यांकडून शुभेच्छा मिळू लागल्या आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.