Breaking News
Home / मालिका / “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेतील दौलतची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री
actress sneha shelar and hrishi shelar
actress sneha shelar and hrishi shelar

“सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेतील दौलतची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या मालिकेचा गुजराती रिमेक येणार आहे या मालिकेतून लतिका आणि अभीमन्यूची कहाणी गुजराती प्रेक्षकांनाही पाहायला मिळणार आहे. सुंदर मनामध्ये भरली या मालिकेत दौलत हे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. कामिनी आणि दौलतच्या कारस्थानामुळे लतिका आणि अभिमन्यूला नेहमीच त्रास झाला आहे. आज दौलतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

actress sneha shelar and hrishi shelar
actress sneha shelar and hrishi shelar

दौलतचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे “ऋषिकेश शेलार”. ऋषिकेश शेलार हा मराठी मालिका ,चित्रपट आणि नाट्य अभिनेता म्हणून ओळखला जातो. ऋषिकेशने सावित्रीजोती, स्वराज्यजननी जिजामाता, छत्रीवाली, शांतेचं कार्ट चालू आहे, लक्ष्मी सदैव मंगलम या गाजलेल्या मालिका आणि नाटकातून अभिनय साकारला आहे. याशिवाय डॉ तात्या लहाणे, जिंदगी विराट, पॅरिस या चित्रपटातून त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. आजवरच्या भूमिकांपैकी दौलतची भूमिका त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अधोरेखित करणारी ठरली आहे. नायका इतकिच खलनायकाची भूमिका देखील तितकीच ताकदीची असते हे त्याने त्याच्या अभिनयातून दाखवून दिले आहे. मिस कामिनी आणि दौलतच्या कटकारस्थानामुळे या मालिकेचा रंग अधिकच खुलत गेला असे म्हणायला हरकत नाही.

actress sneha shelar bhagirathibai
actress sneha shelar bhagirathibai

ऋषिकेश शेलार ची पत्नी “स्नेहा” ही देखील मराठी, हिंदी मालिका अभिनेत्री आहे. अभिनेत्री “स्नेहा अशोक मंगल ” सध्या अँड टीव्ही वरील ‘एक महानायक डॉ बी आर आंबेडकर’ या मालिकेतून जिजाबाईंची भूमिका साकारत आहे. रंगभूमी पासून अभिनयाची सुरुवात केलेल्या स्नेहा मंगल हिने मराठी मालिकेतून देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत तिने भागीरथीबाईंची भूमिका बजावली होती. प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, दुनियादारी फिल्मी ईश्टाइल यासारख्या कलाकृतीतून ती नेहमीच प्रेक्षकांसमोर आली आहे. ऋषिकेश आणि स्नेहाने लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका एकत्रित साकारली होती. या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

sneha shelar actress
sneha shelar actress

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.