Breaking News
Home / मराठी तडका / दत्तू मोरेची बायको आहे उच्चशिक्षित.. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी
dattu more with wife
dattu more with wife

दत्तू मोरेची बायको आहे उच्चशिक्षित.. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी

नवा सोबती, नवी सुरूवात, आशिर्वाद असूद्या असे म्हणत हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याने विवाहबंधनात अडकल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. दत्तूच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकारांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती. गौरव मोरेसह ओंकार भोजनेने दत्तूच्या लग्नातील खास क्षण शेअर करून आपल्या मित्राला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. दत्तूचे लग्न अगदी थाटामाटात आणि धुमधडाक्यात झाले नसले तरी त्याचा साधेपणा उपस्थितांना भुरळ घालणारा ठरला. दत्तूने कोणासोबत लग्न केले याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली.

dattu more with wife
dattu more with wife

चला तर मग जाणून घेऊयात दत्तूची आयुष्यभराची ही जोडीदार नक्की आहे तरी कोण?. दत्तू जिच्याशी विवाहबद्ध झाला तिचे नाव स्वाती घुनागे असं आहे. स्वाती घुनागे ही उच्च शिक्षित आहे. स्वाती ही मूळची वाशीम जिल्ह्यातील अनसिंग गावची. शालेय शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या स्वातीने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. स्त्रीरोग तज्ञ म्हणून अनसिंग गावात तिने घुनागे इस्पितळ उभारले होते. पुढे स्वाती पुण्याला स्थायिक झाली. तळेगाव दाभाडे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे ती कार्यरत आहे. रुग्णांची सेवा करण्या सोबतच स्वाती शाळा, महाविद्यालयात कार्यशाळा घेते. या कार्यकशाळेतून मुलींना योग्य ते मार्गदर्शन देण्याचे काम सातत्याने करत आली आहे.

dattu more wife swati ghunage
dattu more wife swati ghunage

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे सोबत तिचे अरेंज मॅरेज असल्याचे सांगितले जाते. दत्तू ऍक्टर आहे हे स्वातीला ठाऊक होते. अतिशय खडतर प्रवासातून दत्तूने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली आहे हे जाणूनच स्वातीने लग्नाला आपला होकार कळवला. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा दत्तू मोरे हा एक अविभाज्य घटक बनला आहे. रसिका वेंगुर्लेकर आणि समीर चौघुले यांच्या स्किटमध्ये दत्तू असलाच पाहिजे हे एक समीकरणच तयार झालेलं आहे. गौरव मोरेचा सावत्र भाऊ असो वा प्राण्यांची नक्कल करणारा दत्तू प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला आहे. आपण जिथे लहानाचे मोठे झालो त्या चाळीला आपलं नाव देण्याइतपत आपण मोठे झालो. लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकलो ही भावनाच त्याच्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.