Breaking News
Home / मराठी तडका / सलमान खानच्या हिरोईनचं मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल..
actress daisy shah
actress daisy shah

सलमान खानच्या हिरोईनचं मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल..

मराठी चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शिका तसेच निर्मात्या सुषमा शिरोमणी यांनी आपल्या चित्रपटातून बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मराठी चित्रपटातील गाण्यात थिरकायला लावले होते. त्यानंतरही हिंदी सृष्टीतील बहुतेक नायिका मराठी चित्रपटात आयटम सॉंग करताना दिसल्या. अगदी सोनाली बेंद्रे, रेखा, रती अग्निहोत्री, मौसमी चॅटर्जी, जितेंद्र मराठी गाण्यांमध्ये नृत्य सादर करताना दिसले आहेत. त्यानंतरही बरेचसे हिंदी सृष्टीतील कलाकार मराठीत येण्याचे धाडस करताना दिसली. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ २ हा मराठी चित्रपट येत्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटात सलमान खानची नायिका देखील एका आयटम सॉंग मध्ये झळकणार आहे.

actress daisy shah
actress daisy shah

दगडी चाळ २ या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला होता. मकरंद देशपांडे पुन्हा एकदा डॅडींच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘राघू पिंजऱ्यात आला. डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची, मैना मी मुंबईची सायबा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात डेझी शाह या आयटम सॉंगवर थिरकणार आहे. डेझी शाह हिने बॉलिवूड चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नृत्याची विशेष आवड असलेल्या डेझीने सुरुवातीला हिंदी गाण्यात बॅक आर्टिस्ट म्हणून काम केले होते. मात्र पुढे तिला बॉलिवूड चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली आणि ती थेट सलमान खानची नायिका देखील बनली. मुंबईत गुजराथी कुटुंबात तिचा जन्म झाला. मिस डोंबिवली हा किताब तिने जिंकला होता.

ankush chaudhari pooja sawant
ankush chaudhari pooja sawant

बॉडीगार्ड, भद्रा, जय हो, रेस ३ अशा चित्रपटातून तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या. सलमान खाननेच डेझिला हिंदी चित्रपट सृष्टीत आणले होते असे बोलले जाते. काही दाक्षिणात्य चित्रपटातही डेझी झळकली आहे. दगडी चाळ २ या चित्रपटातीळ तिच्या या आयटम सॉंगची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एका दिवसात या गाण्याला दोन लाखाच्या आसपास व्ह्यूज मिळाले असून चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरता लागली असल्याचे असे प्रेक्षकांनी म्हटले आहे. दगडी चाळ चित्रपटाला मिळालेला भरगोस प्रतिसाद याही चित्रपटाला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सुर्या आणि सोनलच्या प्रेम कहाणीची जादू प्रेक्षकांना चित्रपटगृहात नक्कीच खेचून आणणार असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.