Breaking News
Home / मालिका / तुझेच मी गीत गात आहे मालिकेत बालकलाकाराची एन्ट्री..

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत बालकलाकाराची एन्ट्री..

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत मोनिका स्वराजला घेऊन बाहेर गेलेली असते. इथे स्वराज हरवल्याचे ती मल्हारला सांगते. स्वराजला शोधण्यासाठी मल्हारची धावपळ सुरू होते. त्याला शोधून आणल्यामुळे मोनिकाचा पहिला डाव मात्र पुरता फसतो. हे पाहून मोनिका आता स्वराज विरोधात आणखी एक नवा डाव आखताना दिसणार आहे. इकडे रक्षाबंधनाचे औचित्य साधून पिहू स्वराजला राखी बांधून रक्षाबंधन साजरं करताना दिसणार आहे. पिहू आणि स्वराज सोबत या मालिकेत आणखी एका बालकलाकाराची एन्ट्री होत आहे. या बालकलाकाराचे नाव आहे श्रेयस माने.

child actor shreyash mane
child actor shreyash mane

श्रेयस माने या अगोदर अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिकेत झळकला आहे. बाळू मामाच्या नावानं चांगभलं, गाथा नवनाथांची, बॉस माझी लाडाची, सोन्याची पाऊलं अशा वेगवेगळ्या मालिकांमधून श्रेयसला महत्वाच्या भूमिकेत संधी मिळाली. श्रेयस हा चाईल्ड मॉडेल म्हणूनही रॅम्प वॉक करताना दिसला आहे. इंडियन किड्स फॅशन विकच्या ७ व्या सिजनमध्ये त्याने सहभाग घेऊन चाईल्ड मॉडेल म्हणून रॅम्प वॉक केलं होतं. श्रेयस सध्या ८ वर्षांचा आहे, शालेय शिक्षणासोबतच तो अभिनयाचे धडे गिरवत आहे. सुलेखा तळवळकर यांच्या अस्मिता चित्र ऍक्टिंग अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे. या अकॅडमीमधून अनेक बालकलाकारांना मालिका तसेच चित्रपटातून झळकण्याची संधी मिळाली आहे.

anvi taywade anvi joshi
anvi taywade anvi joshi

रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतील सध्याची कार्तिकी म्हणजेच मैत्रेयी दाते ही देखील याच अकॅडमीची विद्यार्थिनी आहे. श्रेयसच्या अभिनयाचे कलागुण हेरून त्याला झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी तसेच स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करता आले आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत लवकरच श्रेयस मानेची एन्ट्री होत आहे. मालिकेच्या सेटवर अवनी जोशी आणि अवनी तायवडे सोबत त्याची छान गट्टी जमली आहे. या दोघींसोबत श्रेयस मालिकेच्या सेटवर खूप बिनधास्तपणे वावरताना दिसतो आहे. या नवीन मालिकेसाठी आणि नवीन भूमिकेसाठी श्रेयस माने या बालकलाकाराचे खूप खूप अभिनंदन.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.