Breaking News
Home / मालिका / मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद

मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद

२ ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. १६ सदस्य १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात आता दाखल झाली आहेत. आज पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या आदेशानुसार सोळा सदस्यांमध्ये चार जणांचे चार गट तयार करण्यात आलेले आहेत. या चार गटातून निरुपयोगी सदस्य कोण? अशा एकाची निवड करावी लागणार आहे. यावरून आता घरात वाद झालेले पाहायला मिळणार आहेत. किरण माने यांच्या गटात नुकताच वाद झाला. त्रिशूल मराठेने आपण तिघेही यंग आहोत असे म्हटले. परंतु हा टास्क जिंकण्यासाठी कोणीतरी निरुपयोगी सदस्य निवडण्यासाठी त्याने किरण माने यांचे नाव सुचवले.

apurva nemlekar bigg boss marathi
apurva nemlekar bigg boss marathi

त्यावर मी काय म्हातारा आहे का? अशी प्रतिक्रिया किरण माने यांनी दिली. तेजस्विनी लोणारी, रुचिरा जाधव, अमृता धोंगडे, मेघा घाडगे, किरण माने, विजय जाधव, प्रसाद जवादे, यशश्री मसुरकर, निखिल राजेशिर्के, समृद्धी जाधव, अमृता देशमुख, विकास सावंत, त्रिशूल मराठे, रोहित शिंदे, योगेश जधव, अपूर्वा नेमळेकर या सदस्यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. पहिल्याच दिवशी त्रिशूलने किरण मानेना डावलण्याचा प्रयत्न केलेला दिसला. तर दुसरीकडे अपूर्वा नेमळेकरच्या गटात प्रसाद जवादे हा निरुपयोगी सदस्य असल्याचे तिने सुचवले. त्यावर प्रसाद आणि अपूर्वामध्ये चांगलाच वाद घडून आला. प्रसादला आपण स्ट्रॉंग कंटेस्टंट आहोत हेच यातून सुचवायचे होते, मात्र अपूर्वाचे मत त्याला मुळीच मान्य नव्हते.

kiran mane apurva nemlekar
kiran mane apurva nemlekar

मी माझं मत मांडू शकते. या मतावर ठाम असलेल्या अपूर्वाने पुढे असेही म्हटले की मला तो कंटेस्टंट तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग वाटतो. प्रसादने यावर आक्षेप घेताच अपूर्वाने प्रसादशी पंगा घेत तू तुझं बोट खाली कर. मला बिग बॉसने माझं मत विचारलं, मी तुझं नाव घेतलं कारण तुझा हा अहंकार आहे. एवढे बलून अपूर्वाने वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले असे म्हणणाऱ्या अपूर्वाने सर्वांचीच बोलती बंद केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अपूर्वा सध्या बिग बॉसच्या घरात चांगलाच राडा घालणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. घरातील सदस्य तिच्यापासून जरा सावधच भूमिका घेणार की वाद होणार नाही याची काळजी घेणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

मराठी बिग बॉसच्या शोमध्ये बहुतेक जण हे कला क्षेत्रातील सदस्य आहेत. विकास सावंत हा छोटा पॅकेट असला तरी बडा धमाका करणारा कोरिओग्राफर आहे. योगेश जाधव हा सदस्य आपल्या उंचीमुळे जेंटल जायंट म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्रिशूल मराठे हा सदस्य सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल आहे. एअरटेल मिस कॉल या स्पर्धेचा तो विजेता ठरला होता. हे नवे चेहरे प्रेक्षकांची मनं कितपत जिंकणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.