Breaking News
Home / मालिका / बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नाराजी…
big boss season 3 happening
big boss season 3 happeningbig boss season 3 happening

बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नाराजी…

बिग बॉसच्या घरातून शिवलीला पाटील हिने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली असल्याने तिचे वोटिंग लाईन बंद करण्यात आले आहे. शिवलीला पाटील गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरी जात आहे. त्यामुळे ती ह्या घरात पुन्हा येणार का असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात नुकताच एक टास्क खेळण्यात आला. सुरुवातीला हा टास्क खेळताना विशाल निकम आणि विकास पाटीलने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. विशाल आणि विकास यांना टास्कमध्ये हरवण्यासाठी गायत्री दातार, मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. परंतु जेव्हा हाच टास्क जय दुधाने आणि गायत्री दातार खेळले त्यावेळी त्यांनी आपले चेहरे पूर्णपणे झाकून घेतले होते.

big boss season 3 happening
big boss season 3 happening

याचमुळे बिग बॉसने दिलेला टास्क गायत्री दातार आणि जय दुधाने यांनी योग्य खेळला असल्याचा निर्णय देण्यात आला. दरम्यान बिग बॉस ने हल्ला बोल टास्कमध्ये भेदभाव केला आहे का? एका टिममध्ये ६ जण आणि दुसऱ्या टिममध्ये ८ जण आणि शिवाय संचालक देखील स्वतःच्याच टीमची बाजु घेणारा आहे… असे मत नाराज प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. ह्याच कारणामुळे जय दुधाने आणि गायत्री दातार यांच्यावर प्रेक्षकांनी भयंकर नाराजी व्यक्त केली आहे. गायत्री दातार ही मिराच्या हो ला हो म्हणते.. तिला स्वतःची बुद्धी वापरता येत नाही का.. असा विरोधी सूर सोशल मीडियावर प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर मीरा जगन्नाथ आणी जय दुधाने यांच्या वागण्यावर देखील प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशाल आणि विकास फेअर गेम खेळले आहेत मग टास्कचा निकाल जय आणि गायत्रीच्या बाजूने का दिला गेला असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बिग बॉस आता पक्षपातीपणा करून निर्णय घेतात की काय असा आरोप या शोच्या बाबतीत पाहायला मिळत आहे.

jay dudhane meera jagannath
jay dudhane meera jagannath

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.