Breaking News
Home / मालिका / तुम्ही जे दिवे लावलेत ते तुम्हाला तरी दिसलेत का? महेश मांजरेकर यांच्या मते टॉपचा स्पर्धक ठरला सर्वांचा लाडका…
big boss marathi top contestants
big boss marathi top contestants

तुम्ही जे दिवे लावलेत ते तुम्हाला तरी दिसलेत का? महेश मांजरेकर यांच्या मते टॉपचा स्पर्धक ठरला सर्वांचा लाडका…

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. या सिझनमध्ये एकापेक्षा एक तगडे स्पर्धक घरात एकत्र आले. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कोण कशी कामगिरी करतंय, घरातील इतर स्पर्धकांसोबत कोण कसं वागतंय यांसारख्या निकषांवर प्रत्येक स्पर्धकाची प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. एकीकडे स्नेहा, गायत्री, दादूस आणि मीरा यांच्याविषयी सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धक मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतोय.

big boss marathi top contestants
big boss marathi top contestants

या स्पर्धकाने अगदी पहिल्या एपिसोडपासून स्वत:चा चाहतावर्ग तयार केला आहे, हा स्पर्धक आहे अभिनेता विशाल निकम. विशाल निकमच्या खेळीवर नेटकरी खूश असून सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. टास्कमधील विशालची कामगिरी, सहकारी स्पर्धकांसोबतचं वागणं पाहून तोच अखेरपर्यंत टिकून विजेता ठरेल, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. जय दुधाने जरी चांगला खेळत असला तरीही एकंदरीत हेकेखोर वागण्यावरून प्रेक्षकांच्या मनातून तो उतरत चालला आहे. पहिल्या तीन दमदार स्पर्धकांच्या यादीत मध्ये विशाल जय आणि सोनाली यांची नावे येऊ शकतील असे वाटते. विकास, मीरा, मीनल आणि उत्कर्ष यांची प्रेक्षकांच्या मनात निगेटिव्ह बाजू नसली तरी विजेत्या स्पर्धकांच्या यादीपासून हे सर्वच जण खूप लांब राहतील असे वाटते. दरम्यान आदिश वैद्य, सुरेखा कुडची, निथा शेट्टी साळवी, अविष्कार दारव्हेकर, तृप्ती देसाई, शिवलीला पाटील यांनी मिळालेल्या संधीचा साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा परंतु हे सर्वजण प्रेक्षकांची पसंती मिळवू शकले नाहीत.

meera jagannath sonali patil vikas patil meenal shah
meera jagannath sonali patil vikas patil meenal shah

एका टास्कमध्ये स्पर्धकांना क्रम निवडायचा होता त्यावेळी स्नेहाने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली तर विशालने शेवटचा क्रम निवडला या क्रमवारीवर प्रत्येकाने आपले मत मांडले बिग बॉसच्या चावडीत ह्या क्रमवारी निवडण्यावर महेश मांजरेकर यांनी आक्षेप घेत ‘तुम्ही ५० दिवस घरात राहिले त्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे होतं तुम्ही कितव्या नंबरवर आहात.. तुम्ही जे दिवे लावलेत ते तुम्हाला तरी दिसलेत का?’ असे म्हणत महेश मांजरेकर यांनी क्रिकेट टीमसाठी अकरा स्पर्धकांच्या नावाची क्रमवारी सांगितली त्यात त्यांनी विशाल आणि जय मध्ये टफ असल्याचे सांगितले परंतु जय जर चिडला नसता त्याचा आरडाओरडा नसता तर मी त्याला एक नंबर दिला असता. त्यामुळे मी विशालला १ नंबर देऊ इच्छितो. २ नंबरवर जय, ३ नंबर मीनल, ४ विकास, ५ उत्कर्ष, ६ मीरा, ७ दादूस, ८ निथा, ९ स्नेहा, १० गायत्री आणि ११ सोनाली.. ही माझी क्रिकेट टीमची लिस्ट आहे असे महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले होते. निथाच्या एक्झिट नंतर घरात खूप साऱ्या घडामोडी झाल्या असल्या तरीही आतापर्यंत जय आणि विशाल यांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दाखवली आहे.

sayali datar dadus santosh utkarsh shinde sneha wagh
sayali datar dadus santosh utkarsh shinde sneha wagh

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.