Breaking News
Home / मालिका / बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री.. ही सदस्य आहे तरी कोण
big boss marathi new entry
big boss marathi new entry

बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री.. ही सदस्य आहे तरी कोण

मराठी बिग बॉसचा चौथा सिजन किरण माने, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर या चार सदस्यांमुळे चांगलाच गाजत आहे. किरण माने विकासचा वापर करून घेतोय असे चित्र या घरात अनेकदा पाहायला मिळाले. विकासला भडकावून तो एकमेकांमध्ये भांडणं लावतोय असे त्याच्याबाबत बोलण्यात येऊ लागले. काल बिग बॉसच्या चावडीवर देखील महेश मांजरेकर यांनी किरण माने ला खडसावले होते; आणि या घरातून बाहेर काढेल असेही ठणकावून सांगितले होते. अर्थात यशश्री मसुरकर, त्रिशूल मराठी यांचाही त्यांनी समाचार घेतलेला पाहायला मिळाला. मराठी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अपूर्वा नेमळेकर हिचा आवाज सर्वत्र गाजला.

big boss marathi new entry
big boss marathi new entry

अमृता धोंगडेने तिच्याशी पंगा घेतला खरा मात्र कालांतराने तिनेही अपूर्वाचा नाद सोडून दिला. ह्या आठवड्यात कॅप्टनसीच्या टास्कमध्ये विकास आणि अक्षय मध्ये चुरस रंगली. मात्र संचालकांच्या निर्णयावर महेश मांजरेकरांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. अक्षय ह्या आठवड्याचा कॅप्टन बनल्याने पुढील आठवड्यापर्यंत तो आता सेफ झोन मध्ये राहिलेला आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणाला घराबाहेर जावे लागणार याची अधिक उत्सुकता आहे. हा सदस्य बाहेर पडताच आज बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यात येणार आहे. वाईल्ड कार्ड द्वारे एन्ट्री घेणाऱ्या सदस्याची झलक शोच्या प्रोमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. ही सदस्य कोण आहे याबाबत नुकताच उलगडा झाला आहे.

aishwarya shete
aishwarya shete

बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये वाईल्डकार्ड एन्ट्री करणारी पहिली सदस्य आहे ऐश्वर्या शेट्ये. ऐश्वर्या शेट्ये ही मालिका अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत ऐश्वर्याने सोनालीचे पात्र साकारले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने या मालिकेचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठीच तिने या मालिकेतून काढता पाय घेतला असल्याचे आता समोर आले आहे. या मालिके अगोदर ऐश्वर्याने ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून काम केले होते. ऐश्वर्याच्या जागी आता फुलाला सुगंध मातीचा मालिकेत सोनालीच्या भूमिकेत कांचन प्रकाश झळकत आहे. ऐश्वर्याने आपल्या अभिनयाने रंगवलेले सोनालीचे पात्र कांचनसाठी आव्हानात्मक ठरले.

कारण प्रेक्षक इतके दिवस ज्या भूमिकेत एखाद्या कलाकाराला पाहत असतात त्याजागी दुसऱ्या कोणाला पाहणं ते सहजासहजी स्वीकारत नाहीत. म्हणूनच कांचनला प्रेक्षक स्वीकारतील की नाही अशी शंका उपस्थित झाली होती. आता ऐश्वर्या शेट्ये बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री करणार आहे. अगोदरच्या सदस्यांची खेळी ती बाहेरून पाहून आल्याने या घरात टिकून राहण्यासाठी ती काय खेळी खेळते याची उत्सुकता आहे. घरातील सदस्यांमध्ये ऐश्वर्या स्वतःची कशी ओळख बनवते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.