Breaking News
Home / मराठी तडका / भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचे निधन.. चेहऱ्यावर जखमा असल्याने घातपात झाल्याची

भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचे निधन.. चेहऱ्यावर जखमा असल्याने घातपात झाल्याची

प्रसिद्ध मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची मोठी बहिणी मधु मार्कंडेय हिचे रविवारी आकस्मिक निधन झाले आहे. भाग्यश्री सह तिचे कुटुंबीय पूर्णपणे खचून गेले आहेत. मात्र चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने मधूचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. भाग्यश्रीची मोठी बहीण मधू संकेत मार्कंडेय ही पुण्यात वास्तव्यास होती. मधु केक बनवण्याचा व्यवसाय करत होती, यात तिला एका मैत्रिणीची साथ मिळायची. वाकड परिसरात एखादे छोटेसे दुकान किंवा खोली भाड्याने मिळावी म्हणून मधू मैत्रिणीबरोबर वाकडच्या परिसरात शोधाशोध करत होती. अशातच मधूला चक्कर आली आणि दात खिळी बसून ती खाली कोसळली.

bhagyashree mote sister
bhagyashree mote sister

मधूच्या मैत्रिणीने लगेचच तिला जवळच असलेल्या एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र इथे उपचार होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मधूला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र इथे आल्यावर डॉक्टरांनी मधूला मृत घोषित केले. पोलिसांनी मधूचा मृत्यू आकस्मिक झाला अशी नोंद केली आहे. मात्र तिच्या कुटुंबियांनी ही घातपाताची शक्यता आहे असा संशय व्यक्त केला आहे. याबाबत चौकशी व्हावी अशी तिच्या घरच्यांनी मागणी केली आहे. गेल्या महिन्यातच मधूच्या नवऱ्याचे निधन झाले होते. त्यांना दोन लहान मुलंही आहेत. बहीण आणि दाजीच्या मृत्यू पश्चात तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी आता भाग्यश्री सांभाळणार आहे. बहिणीच्या निधनाने भाग्यश्री खूपच दुःखी झाली आहे. माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला.

bhagyashree sister madhu
bhagyashree sister madhu

माझी आई, बहीण, मित्र, विश्वासू आणि काय नाही? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू? तू मला ते कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू हा अटळ आहे, पण मी तुला कधीच जाऊ देणार नाही, कधीच नाही. तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता, बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल. असे म्हणत भाग्यश्रीने बहिणीच्या आठवणीत भावुक झाली. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना भाग्यश्री मोटे हिने चंदेरी दुनियेत प्रवेश केला होता. चित्रपट, मालिकांमधून तिला मोठे यश मिळत गेले. या सर्वांमध्ये तिला तिच्या बहिणीची मोठी साथ मिळाली होती. त्यामुळे बहिणीच्या निधनाने भाग्यश्री खूपच भावुक झाली आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.