Breaking News
Home / मराठी तडका / बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न
balumama sumeet pusavale
balumama sumeet pusavale

बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न

सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीतही अनेक कलाकार मंडळी लग्नाच्या गाठी बांधताना दिसत आहेत. अहाचं लग्न म्हणून मराठी सृष्टीत लोकप्रिय जोडी ठरलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडला तर नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी देखील काल मोठ्या थाटात लग्न केलेलं आहे. आता लवकरच मराठी सृष्टीतील आणखी एक लाडका अभिनेता विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहे.

balumama sumeet pusavale
balumama sumeet pusavale

बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका जवळपास चार वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेचा नायक म्हणजेच अभिनेता सुमित पुसावळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी सुमितचा साखरपुडा संपन्न झाला असल्याची बातमी व्हायरल झाली होती. सुमितने स्वतः देखील लग्न ठरल्याची कल्पना त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकली होती. येत्या १४ डिसेंबर रोजी सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांचा लग्नाचा बार उडणार आहे. ‘उनका हाथ पकडना तो बस एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था’ असे कॅप्शन देऊन सुमितने मोनिका सोबत प्रिवेडिंग फोटो शूट केलं आहे.

sumeet pusavale monika mahajan
sumeet pusavale monika mahajan

सुमित आणि मोनिका यांचं हे अरेंज मॅरेज असणार आहे. मोनिका ही मूळची जळगावची असून ती आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. साखरपुडा झाल्यानंतर सुमीत आणि मोनिकाने काही दिवसातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. १४ डिसेंबर रोजी या दोघांच्या लग्नाचा बार उडणार असल्याने त्यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्न खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. सुमित पुसावळे याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो मूळचा दिघंची गावचा. लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतून सुमित छोट्या पडद्यावर झळकला होता. याअगोदर त्याने असिस्टंट डायरेकक्ट म्हणून काम केले होते. मात्र अभिनयाची आवड आणि देखणा चेहरा लाभलेल्या सुमितला या क्षेत्रात येण्याची ओढ लागली.

लागीरं झालं जी या मालिकेत तो विरोधी भूमिकेत दिसला. स्वराज्य रक्षक संभाजी, बाळू मामाच्या नावानं चांगभलं अशा मालिकांमधून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. बहुतेक ठिकाणी त्याला बाळू मामा म्हणूनच आता ओळखले जाते, त्याप्रमाणे त्याचे आदरातिथ्य देखील करण्यात येते. या भूमिकेने मला खूप काही दिलंय असे तो नेहमी म्हणतो. आता हाच लाडका बाळू मामा म्हणजेच सुमित पुसावळे विवाहबद्ध होणार असल्याचे कळताच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.