Breaking News
Home / जरा हटके / खंत एवढीच वाटते की, या मातीत काम करायला मिळालं नाही.. अशोक समर्थ यांनी व्यक्त केली भावना

खंत एवढीच वाटते की, या मातीत काम करायला मिळालं नाही.. अशोक समर्थ यांनी व्यक्त केली भावना

झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका आकाशच्या येण्याने एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळाली आहे. आकाश जोशी हे पात्र अनामिका आणि सौरभच्या नात्यात दुरावा ठरल्याने प्रेक्षकांनी या पात्रावर रोष व्यक्त केला आहे. मालिका सुरळीत सुरू असताना मध्येच हे पात्र का घुसडले गेले हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. ही भूमिका साकारत असताना अशोक समर्थ यांना मात्र प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. आपल्या आयुष्यात अशी एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळावी ज्यामुळे आपल्याला ओळखले जाईल ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. अशी ईच्छा आकाशच्या पात्रामुळे पूर्ण झाली, असे मत अशोक समर्थ यांनी व्यक्त केलं आहे.

ashok samarth tu tevha tashi
ashok samarth tu tevha tashi

प्रेक्षकांकडून होत असलेली टीका हीच माझ्या कामाची पावती आहे असे ते या भूमिकेबाबत बोलताना म्हणतात. अशोक समर्थ यांनी लक्ष्य या लोकप्रिय मालिकेतून एसीपी अभय कीर्तिकर हे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर तब्बल ८ ते ९ वर्षानंतर ते तू तेव्हा तशी मधून पुन्हा मराठी मालिकेकडे वळलेले पाहायला मिळाले. खरं तर अशोक समर्थ या इंडस्ट्रीत खूप कमी काळ रुळले असे बोलले जाते. नुकतेच एका मुलाखतीत याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. मराठी इंडस्ट्रीचा एक वेगळा चेहरा अनुभवलेल्या अशोक समर्थ यांनी या मुलाखतीत अनेक खुलासे केले. मी मूळचा बारामतीचा, चंदेरी दुनियेच्या ओढीने गाव सोडून आलो पण खंत एवढीच वाटते की या मातीत मला काम करायला मिळालं नाही.

ashok samarth shilpa tulaskar
ashok samarth shilpa tulaskar

बॉलिवूड, भोजपुरी, दाक्षिणात्य प्रातांत मी अभिनेता म्हणून जगलो पण महाराष्ट्रात  मात्र मला रमू दिलं नाही. रणांगण हे माझं पहिलं नाटक, ह्या नाटकातून मी अभिनयात घडलो. टिपिकल माहोल होता पण माणूस म्हणून घडलो. बारामती सारख्या ग्रामीण भागात पवारवाडीत, मी एका सर्व साधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात वाढलो. सिनेमाचा प्रवास सुरू झाला तसतसा मी घडत गेलो. लक्ष्य मालिकेने मला मोठी लोकप्रियता मिळाली. आकाश ही भूमिका विरोधी धाटणीची आहे, मला या भूमिकेबाबत जाणून घ्यावे लागले. जवळपास १०० एपिसोड नंतर माझी एन्ट्री झाली. ही भूमिका सशक्त होती, आकाशच्या येण्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळाले.

आकाश का आला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळते, त्यावेळी ही माझ्या कामाची पावती ठरते. मराठी सृष्टीत मला नक्कीच काम करायचं आहे. मराठी चित्रपट ताकदवान बनत आहेत. मी मराठी सृष्टीत रमत नाही असं नाही, पण इथे मला अनेकांकडून वेगवेगळे सल्ले मिळाले. तू खूप उंच आहेस, तू महाराष्ट्रीयन वाटत नाहीस, ग्रामीण भाषेतून आल्याने तुझी भाषा शुद्ध नाही, असे माझ्याबाबत म्हटले गेले. मग यावर खूप विचार केला, खूप स्ट्रगल केला. बॉलिवुड, भोजपुरी चित्रपटातून मला कामं मिळत गेली. खूप वर्षानंतर मला आकाश जोशी हे पात्र साकारायला मिळतंय याचा मला आनंद आहे’.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.