Breaking News
Home / जरा हटके / अशोक सराफ यांनी सांगितला निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा किस्सा..
ashok saraf love story
ashok saraf love story

अशोक सराफ यांनी सांगितला निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा किस्सा..

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची लाडकी जोडी. अनेक चित्रपटात एकत्रित काम करून या जोडीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. १९९० साली हे दोघेही गोव्याच्या मंगेशी मंदिरात विवाहबद्ध झाले होते. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे निवेदितासोबत त्यांची फार जुनी ओळख होती. चित्रपटात एकत्रित काम करत असताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते हे बहुतेकांना माहित आहे मात्र अशोक सराफ यांनीच निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा एक किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. अशोक सराफ आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत खूप कमी बोलताना दिसले आहेत.

ashok saraf love story
ashok saraf love story

मात्र प्रथमच त्यांनी निवेदीतच्या प्रेमात पडल्याचा एक किस्सा सांगितलेला आहे. १९८८ साली मामला पोरींचा या चित्रपटात या दोघांनी एकत्रित काम केलं होतं. त्यावेळी घडलेल्या किस्याबाबत ते म्हणतात की, ‘मामला पोरींचा या चित्रपटात एकत्रित काम करत असताना निवेदिताचं पॅकअप झालं त्यानंतर ती माझ्याजवळ आली आणि मला बाय म्हणाली. त्यावेळी मला वाईट वाटलं पण मी ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. ती जात असताना माझ्या डोक्यात आलं की समोर असलेल्या दाराजवळ गेल्यावर ती आपल्याकडे वळून बघणार आणि तसंच झालं. तेव्हाच मला खात्री पटली की आमच्यामध्ये काहीतरी नक्की आहे.’ नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात या दोघांनी पुन्हा एकदा एकत्रित काम केलं. याचवेळी त्यांच्यातील मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

nivedita ashok saraf
nivedita ashok saraf

निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या वयात १८ वर्षांचं अंतर आहे. ही गोष्ट निवेदीताच्या आईला मुळीच मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी या लग्नाला विरोध केला होता. मात्र बहिणीच्या पुढाकाराने त्यांनी लग्नाला परवानगी दिली. गोव्यातील मंगेशी मंदिरात आई आणि बहिणीसह जाऊन या दोघांनी अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली होती. मुलगा अनिकेतच्या जन्मानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. हंसगामीनी साड्यांचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पुन्हा एकदा चित्रपट मालिकांमधून पुनःपदार्पण केले. अग्गबाई सासूबाई मालिकेनंतर त्या छोट्या पडद्यावर चांगल्याच रुळलेल्या पाहायला मिळाल्या. सध्या कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला मोहिते हे पात्र साकारत आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.