Breaking News
Home / मराठी तडका / दगडी चाळ २ चित्रपटात झळकणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलं?
arnav kalkundri ankush chaudhari
arnav kalkundri ankush chaudhari

दगडी चाळ २ चित्रपटात झळकणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलं?

‘तो परत आला’ असे म्हणत दगडी चाळ २ या आगामी चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. दगडी चाळ चित्रपटाच्या भरगोस यशानंतर त्याचा सिकवल काढण्याचा निर्णय घेतला. अरुण गवळी यांची गुन्हेगारी जगतातील सुरुवात ते राजकीय क्षेत्रातील पदार्पण या सर्व घडामोडींची दगडी चाळ साक्षीदार आहे. दगडी चाळ चित्रपटातून डॅडींचा दरारा पुन्हा एकदा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्यानंतर भायखळा कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर अरुण गवळी यांनी दगडी चाळीला आपला बालेकिल्ला बनवला होता.

arnav kalkundri ankush chaudhari
arnav kalkundri ankush chaudhari

अंडरवर्ल्ड मधील घडामोडी, पोलिसांसोबतच्या चकमकी, अटकसत्र हे सर्व टाळण्यासाठी या चाळीचा त्यांनी चेहरामोहराच बदलून टाकला होता. डॅडी उर्फ अरुण गवळी यांच्याच जीवनावर आधारित दगडी चाळ २ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनल आणि सूर्याची जुळून आलेली केमिस्ट्री याही चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. धागा धागा विणलेल्या नात्याची, दिवसागणिक फुललेल्या कलरफुल प्रेमाच्या या  कहाणीत अंशुमनची एन्ट्री होत आहे. अंशुमनच्या भूमिकेतला हा चिमुरडा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या बालकलाकाराबद्दल काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात.

ankush arnav pooja sawant
ankush arnav pooja sawant

अंशुमनच्या भूमिकेत दिसणाऱ्या या चिमुरड्याचे नाव आहे ‘अर्णव कालकुंदरी’. अर्णव कालकुंदरी खूप लहान असल्यापासूनच या क्षेत्रात काम करतो आहे. पुणे येथे आयोजित केलेल्या इंडिया किड्स फॅशन विक मध्येही त्याने सहभाग दर्शवला होता. Tangle creations या फॅशन ब्रँडचा तो ब्रँड अँबेसिडर ठरला होता. झी मराठीच्या चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वात अर्णवने प्रहसन सादर केले होते. त्यावेळी त्याच्या अचाट विनोदबुद्धीचे सर्वांनी मोठं कौतुक केलं होतं. या शोमुळे अर्णवला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. झूम, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, अळीमिळी गुपचिळी, सत्यमेव जयते २, गुड नाईट इंडिया अशा वेगवेगळ्या रिऍलिटी शो तसेच चित्रपटातून तो झळकला आहे.

झी मराठी वरील अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमात तो अतुल परचुरे यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता. कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या मराठी सेलिब्रिटींच्या मुलांसोबत तो मजामस्ती करताना दिसला. झी मराठी आणि अर्णवचे नाते तितकेच खास बनलेले पाहायला मिळाले. ‘सत्यवान सावित्री’ या आणखी एका मालिकेत त्याला झळकण्याची नामी संधी मिळाली. दगडी चाळ २ या चित्रपटात तो सुर्या आणि सोनलच्या मुलाची म्हणजेच अंशुमनची भूमिका साकारत आहे. या नव्या भूमिकेसाठी आणि अभिनय क्षेत्राच्या यशस्वी प्रवासासाठी अर्णव कालकुंदरी याला खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.