Breaking News
Home / जरा हटके / आई कुठे काय करते फेम अर्चना पाटकर यांच्या सुने विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
hemlata bane archana patkar
hemlata bane archana patkar

आई कुठे काय करते फेम अर्चना पाटकर यांच्या सुने विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आई कुठे काय करते मालिका फेम ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून हेमलता बाणे यांच्याविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हेमलता बाणे या सुद्धा अभिनेत्री आहेत. त्यांनी लावू का लाथ, कॅरी ऑन देशपांडे, नवरा माझा भवरा या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे हेमलता यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हेमलता बाणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष घालण्याची मागणी केली आहे. हेमलता बाणे यांचे वडील वासुदेव बाणे हे जोगेश्वरी येथील शंकरवाडी येथे वास्तव्यास होते, तिथे त्यांचे स्वतःचे घर होते.

actress hemlata bane
actress hemlata bane

परंतु बिल्डरकडुन या घराचे वाद झाले. या प्रकरणी कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे मात्र अजूनही कोर्टाकडून निर्णय येणे बाकी आहे. तरीदेखील संबंधित बिल्डरने त्याच्या काही माणसांना घेऊन घराची तोडफोड सुरू केली. घरातील दागिने आणि पैसे बिल्डरच्या लोकांनी लंपास केले. यात हेमलता बाणे यांनी विरोध केला. तेव्हा बिल्डरकडूनच हेमलता बाणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसातच आई वडिलांच्या राहत्या घरावर हातोडा पडल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हतबल होऊन हेमलता बाणे यांनी मुख्यमंत्यानाच टॅग करत या बातमीत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान या संदर्भात हेमलता बाणे यांनी सविस्तर अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

hemlata bane prajakta mali
hemlata bane prajakta mali

हेमलता म्हणतात की, जोगेश्वरी पूर्व शंकरवाडी shekha chala रूम नंबर २, vasudeo Bane अभिनेत्री हेमलता बाणे यांच्या आईच्या घरावर, कोर्टात केस चालू असताना एस आर ए व पोलीस सरक्षणात घरावर हतोडा! पावसाळा सुरू झाला असताना घर तोडताय? अभिनेत्री हेमलता बाणे यांच्या आईच्या घरावर, कोर्टात केस चालू असताना एस आर ए व पोलीस संरक्षणात घरावर हतोडा! तोंडावर पावसाळा सुरू झाला असताना अशी कारवाई करण्याचे अधिकार सरकारने दिले आहेत का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात बिल्डरच्या माणसांना विरोध करणाऱ्या अभिनेत्री हेमलता बाणे यांनाच मेघवाडी पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे काम पोलीस अधिकारी करत आहेत!

ज्या बिल्डरने बिल्डरच्या माणसांनी त्यांना अभद्र भाषेत वागणूक दिली, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सरकारी कामात अडथळा म्हणजे बिल्डरला कसेही वागण्याची परवानगी असते का? Ji manase gharat toda foda karayla ghusali hoti tyani gharat paishan chi gold jewellery, molyvan vastunchi chori keli . Tychi complaint sudha police ni ghetali nahi ka? असा प्रश्न हेमलता बाणे यांनी विचारला आहे सध्या त्या मेघवाडी पोलीस स्टेशन मध्ये न्यायासाठी गेल्या आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.