Breaking News
Home / जरा हटके / लाखों दिलों की धडकन बिग बॉसच्या घरात.. या अभिनेत्रीची ग्रँड एन्ट्री

लाखों दिलों की धडकन बिग बॉसच्या घरात.. या अभिनेत्रीची ग्रँड एन्ट्री

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. उद्या रविवारी या शोचा ग्रँड प्रीमिअर असल्याने घरात एन्ट्री घेतलेल्या सदस्यांची झलक प्रोमोमधून दाखवण्यात येत आहे. यावेळी एका प्रोमोमध्ये कपलने एकत्रित केलेला डान्स पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी बिग बॉसच्या प्रिमिअरचा सोहळा संध्याकाळी ७ वाजताच प्रसारित होत असल्याने हा शो लहान मुलं देखील पाहतात. मात्र अशा बोल्ड डांसमुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होतील अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. या बोल्ड डान्स सादर करणाऱ्यामध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव असल्याचे म्हटले जात आहे. तर एक सोलो परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाला.

apurva nemlekar tejashree jadhav
apurva nemlekar tejashree jadhav

एम टीव्ही वरील स्प्लिट्सव्हीला या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झालेली मराठमोळी स्टार समृद्धी जाधव असल्याचे समोर आले आहे. समृद्धी जाधव हिने स्प्लिट्सव्हीला मधून चांगली प्रसिद्धी मिळवली होती. आता ती मराठी बिग बॉसच्या घरात येऊन काय धुमाकूळ घालते हे पाहावे लागेल. शोच्या आणखी एका प्रोमोमधून नायिकेची एन्ट्री करण्यात आली आहे. या अभिनेत्रीची झलक पाहून ही अपूर्वा नेमळेकर असावी असा अंदाज बांधला जात आहे. परंतू अपूर्वा नेमळेकरने अशा शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. मी एक अभिनेत्री असून मला वेगवेगळ्या भूमिकेत जगायला आवडतं आणि हेच माझं काम आहे असे तिने म्हटले होते. बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर जाणार नसल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.

tejashree jadhav
tejashree jadhav

ही एन्ट्री घेणारी अभिनेत्री तेजश्री जाधव असावी असे बोलले जात आहे. तेजश्री जाधव हिने दाक्षिणात्य चित्रपटात नाव कमावलं आहे. काही हिंदी भाषिक वेबसिरीजमध्ये देखील ती झळकली आहे. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी होईल असे तिच्याबाबत सतत बोलले जात होते. तेजश्रीने मराठी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची ऑफिशियल अनाऊन्समेंट केलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे तेजश्री जाधव सहभागी होणार यावर शिक्कामोर्तब केला जात आहे. तेजश्री जाधव ही बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिच्या बोल्ड फोटोंवर अनेक चाहते फिदा आहेत. लाखों दिलों की धडकन असे म्हणत बिग बॉसच्या घरात तिचे ग्रँड वेलकम केले जात आहे. बिग बॉसच्या घरात तेजश्री बॉसगिरी करणार की सर्वांना सांभाळून घेणार याचा लवकरच उलगडा होईल.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.