Breaking News
girija and chinmay ugdirkar
girija and chinmay ugdirkar
Home / जरा हटके / अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने.

महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे अँड सून, सख्खे शेजारी अशा गाजलेल्या मालिकांमधून त्याने प्रमुख नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत तर मेकअप, प्रेमवारी, वाजलच पाहिजे, श्यामचे वडील, गुलबजाम अशा चित्रपटातून तो कधी नायक तर कधी सहकलाकार बनून प्रेक्षकांसमोर आला. चित्रपट मालिका या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार्स – छोटे मास्टर्स या स्टार प्रवाहवरील रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन त्याने केले होते. झी मराठीवर त्याने अग्गबाई सासूबाई या मालिकेसोबत नांदा सौख्यभरे मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती. एक शांत, संयमी आणि तितकाच हसमुख असलेला चिन्मय आपल्या अभिनयाने चांगलाच भाव खाऊन जाताना दिसतो ही त्याच्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल.

girija joshi and chinmay udgirkar
girija joshi and chinmay udgirkar

अग्गबाई सासूबाई मालिकेत तो अनुरागच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका देखील त्याच्या कारकिर्दीत अधोरेखित करणारी ठरेल अशी आशा आहे. २०१५ साली चिन्मय उदगीरकर अभिनेत्री गिरीजा जोशी हिच्यासोबत विवाहबद्ध झाला होता. गिरीजाने देखील मराठी चित्रपटातून काम केले आहे स्वप्नील जोशी, अनिकेत विश्वास राव, गश्मीर महाजनी, सुबोध भावे यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली असून गोविंदा, देऊळबंद, प्रीयतमा, धमक, पावडर, तो आणि मी हे चित्रपट तिने प्रमुख नायिका म्हणून साकारले आहेत. लग्नानंतर मात्र गिरीजा फारशा कोणत्या चित्रपटात दिसली नसली तरी स्वतःची डान्स अकॅडमी ती चालवत आहे. यातून अनेकांना तिने नृत्याचे धडे दिले आहेत. शिवाय गिरीजा आपल्या फिटनेसलाही पहिले प्राधान्य देते नेहमी वर्कआऊट, योगा करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.