Breaking News
Home / मराठी तडका / एप्रिल फुल होतं रे काल! म्हणत मराठी सृष्टीतील अभिनेत्याने दिली पुत्ररत्न प्राप्तीची बातमी
anvi anshuman vichare with brother

एप्रिल फुल होतं रे काल! म्हणत मराठी सृष्टीतील अभिनेत्याने दिली पुत्ररत्न प्राप्तीची बातमी

​मराठी सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. कालच मृणाल दुसानिस हिने लेकीच्या आगमनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. नूरवी असे मृणाल दुसानिस हिच्या लेकीचं नाव आहे. २४ मार्च रोजी मृणालला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. काल तिने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तर आज मराठी सृष्टीतील आणखी एका अभिनेत्याच्या घरी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सिनेमा, नाटक आणि टेलिव्हिजन जगतातील हा अभिनेता आहे अंशुमन विचारे.

anvi anshuman vichare with brother
anvi anshuman vichare with brother

अंशुमनला १ एप्रिल रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. त्यामुळे ‘एप्रिल फुल होतं रे काल’ असे म्हणत त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंशुमन विचारे याने मराठी सृष्टीत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. विशेष करून त्याच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हास्य महल, घरोघरी, कानामागून आली, उचापती या विनोदी मालिका. सोबतच त्याने संघर्ष, भरत आला परत, मिसळ पाव, सूर राहू दे, शिनमा, परतू, पोश्टर बॉईज, वेड लावी जिवा चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

anshuman vichare family
anshuman vichare family

खाऊ गल्ली, पंढरीची वारी, सारे सारे गाऊया, चालता बोलता, शाहिरी बाणा या कार्यक्रमाचे त्याने सूत्रसंचालन केले आहे. अंशुमन विचारे हा पल्लवी सोबत विवाहबद्ध झाला. पल्लवी पेशाने वकील आहे आणि अन्वी विचारे ही त्यांची मुलगी सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जाते. युट्युबवर तिच्या नावाने एक चॅनल आहे. अन्वी अनेक मजेशीर व्हिडीओ या चॅनलवर पाहायला मिळतात. तिच्या या व्हिडिओजना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अन्वीचा निरागसपणा या व्हिडिओतून प्रेक्षकांना भावला आहे त्यामुळे तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच अंशुमनने नवीन घर घेतलं आहे. ह्या नव्या घराची ओळख अन्वीने तिच्या युट्युबवरील व्हिडिओतून करून दिली होती. अन्वीला भाऊ झाला म्हणून ती भलतीच खुश झालेली आहे. आपल्या लहान भावला ती मांडीवर घेऊन खेळवताना दिसली. नुकत्याच जन्मलेल्या लाडक्या भावाचे कौतुक करत अन्वी बोबड्या बोलात त्याची ओळख करून देत आहे. अंशुमन आणि पल्लवी विचारे यांना पुत्ररत्न प्राप्ती बद्दल खूप खूप शुभेच्छा!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.