Breaking News
Home / मराठी तडका / माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याने २१ दिवसांसाठी मालिकेतून घेतला ब्रेक.. समोर आले कारण

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याने २१ दिवसांसाठी मालिकेतून घेतला ब्रेक.. समोर आले कारण

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आतापर्यंत टॉप दहाच्या यादीत झी मराठीच्या या एकमेव मालिकेने आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास यश मिळवले आहे. नुकतेच नेहा आणि यशचा संसार खुलू लागला असतानाच सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला नवरा कटकारस्थानाचा डोंगर रचताना दिसत आहेत. मात्र या संकटातून वाट काढत नेहा यश पुढे जात आहेत. त्यांना मिथिला आणि विश्वजित काका काकूची मदत मिळत आहे. मात्र अशातच आता विश्वजित काका या मालिकेतून तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत. विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे यांनी साकारले आहे.

mazi tuzi reshimgath
mazi tuzi reshimgath

आनंद काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्य तसेच चित्रपट, मालिका सृष्टीत कार्यरत आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या आनंद यांनी आपले शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. आनंद काळे हे हॉटेल व्यावसायिक आहेत हे बऱ्याच जणांना माहीत आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध हॉटेल कार्निव्हल आणि राजपुरुष यांचे ते मालक आहेत. हॉटेल व्यवसायासोबत त्यांचा गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला त्यांच्या कुटुंबियांची देखील साथ मिळताना दिसते. आनंद यांना स्पोर्ट्स बाईक्सची अत्यंत आवड आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आनंद यांनी बायकिंग आणि रेसिंगमध्येही सहभाग दर्शवला होता. त्यांचे लक्झरी बाईक आणि लक्झरी कार प्रेम त्यांच्या मित्रपरिवाराला चांगलेच परिचयाचे आहे.

anand kale leh ladakh bike ride
anand kale leh ladakh bike ride

बाईकवरून ‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लदाख’ अशी एक ट्रिप करण्याची त्यांची ईच्छा आहे. Kawasaki Ninja 1000 ही बाईक त्यांनी काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. पुढील २१ दिवस ७००० किलोमीटरचा प्रवास करून ते आपले स्वप्न पूर्ण करताना दिसणार आहेत. त्याचमुळे त्यांनी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वीच संगीतकार अजय अतुल फेम अतुल गोगावले यांनी BMW R1250 GS ही स्पोर्ट बाईक खरेदी केली होती. त्यावेळी आनंद काळे यांनी अतुल गोगावले यांचे अभिनंदन करत ‘चला आता राईडला लेह लडाख इन जुलै’. तेव्हा आता आनंद काळे महिनाभर तरी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून दिसणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.