Breaking News
Home / मराठी तडका / वयाच्या ४३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी.. चुकीचा अर्थ काढल्याने सेलिब्रिटींचा उडाला गोंधळ
amruta subhash good news
amruta subhash good news

वयाच्या ४३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी.. चुकीचा अर्थ काढल्याने सेलिब्रिटींचा उडाला गोंधळ

मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना लग्न होऊन कित्येक वर्षे झाली तरी अजूनही ते अपत्याच्या प्रतीक्षेत आहेत. मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांना देखील अजूनही मूल नाही. मात्र अमृताचा एका पोस्टवरून सध्या सेलिब्रिटी विश्वात एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. अमृताने प्रेग्नन्सी किटचा एक फोटो शेअर करून आई बनणार असल्याची पोस्ट दिली आहे. मात्र या पोस्टमध्ये तिने ज्या प्रेग्नंट असल्याचे म्हंटले आहे.

amruta subhash good news
amruta subhash good news

अर्थात जया या नावाकडे आणि तिच्या कॅप्शनकडे कोणाचेच लक्ष्य गेले नसल्याने अमृता प्रेग्नंट आहे असा समज सेलिब्रिटींनी करून घेतला. या गोंधळामुळे अमृता वयाच्या ४३ व्या वर्षी आई बनत असल्याची गोड बातमी ऐकून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षण केला आहे. मराठी सेलिब्रिटी विश्वातील सुबोध भावे, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, सई देवधर, मानसी कुलकर्णी. आरोह वेलणकर, मानसी नाईक, अभिज्ञा भावे यांनी आणि अशा बऱ्याच जणांनी गैरसमजातून अमृतावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मात्र हा गोंधळ पाहून अमृताने जया प्रेग्नन्ट असल्याची बातमी पुन्हा एकदा अधोरेखित केलेली पाहायला मिळत आहे. अमृता सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे.

beautiful amruta subhash
beautiful amruta subhash

मर्डर इन अ कोर्ट रूम हा प्रोजेक्ट २८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येत आहे. यात अमृता महत्वाची भूमिका साकारत आहे; मुख्य पात्र असलेली जया प्रेग्नन्ट असल्याची पोस्ट तिने  शेअर केली आहे. हे सर्व प्रेक्षकांचे लक्ष्य वेधण्यासाठी अमृताने हा खटाटोप केला असल्याने सेलिब्रिटींमध्येही कमालीचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. त्यामुळे तूर्तास तरी अमृताकडे गोड बातमी नाही हे तिच्या स्पष्टीकरणावरूनच समोर आले आहे. आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी कलाकार मंडळी काय काय युक्त्या आखतील हे अजूनही कोणाला समजणे कठीण झालं आहे. मागे अशाच पद्धतीने चित्रपट आणि नाटकांचे प्रमोशन करण्यात आले होते.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.