Breaking News
Home / मालिका / मन उडू उडू झालं मालिकेतून दोन कलाकारांची एक्झिट.. शूटिंग पूर्ण करून दिला भावनिक निरोप
man udu udu jhala serial
man udu udu jhala serial

मन उडू उडू झालं मालिकेतून दोन कलाकारांची एक्झिट.. शूटिंग पूर्ण करून दिला भावनिक निरोप

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्रा आता चांगली नोकरी स्वीकारून देशपांडे सरांकडून दिपूसोबत लग्न करायला परवानगी मिळवणार आहे. त्यामुळे दिपू आणि इंद्राच्या लग्नसोहळ्याची अनेकजण वाट पाहत आहेत. मालिका पुढे चालू असतानाच दोन कलाकार या मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. जवळपास २०० एपिसोड शूट केल्यानंतर काल या दोन्ही कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे. नयन कानविंदे आणि नयन रावची मम्मी म्हणजेच अभिनेता अमित परब आणि कस्तुरी सारंग यांनी काल मालिकेचे शूटिंग पूर्ण करून या मालिकेला भावनिक निरोप दिला आहे.

man udu udu jhala serial
man udu udu jhala serial

अमित परबने एमबीएचे शिक्षण पूर्ण करून कार्पोरेट क्षेत्रात नोकरी स्वीकारली. आपली नोकरी सांभाळून तो या मालिकेत अभिनयाची आवड जोपासताना दिसला.  शलाकाला त्रास देणारा हा नयन प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे गेला. नयन रावांचे पात्र विरोधी जरी असले तरी या भूमिकेने अमितला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे ही भूमिका त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली होती. मालिकेतून लवकरच नयनरावांची एक्झिट होणार आहे. काल त्याने अखेरच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण करून एक भावनिक निरोप दिला आहे. मालिकेच्या काही खास आठवणी शेअर करत अमित म्हणतो की, आज मी माझा शेवटचा भाग शूट केला.

amit parab kasturi sarang
amit parab kasturi sarang

आणि जड अंतःकरणाने २०० एपिसोड्सच्या शूटिंगनंतर निरोप घेण्याची वेळ आली आहे. मला वाटत नाही की मी या क्षणी फार काही व्यक्त करू शकेन. पण मला या अद्भुत संधीबद्दल सर्वांचे आभार मानायचे होते. हो खरोखर माझ्यासाठी सर्वकाही बदलले. इतक्या कमी वेळात मला मिळालेल्या प्रेम, ओळख, प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ आहे. कॉर्पोरेट जॉब सोबतच माझी आवड सांभाळू शकेन असे मला कधीच वाटले नव्हते. पण मला वाटते की देव खूप दयाळू आहे आणि त्याने मला दोन्ही संधी दिल्या. मी थोडा दुःखी देखील आहे कारण अभिनयाचा एक टप्पा संपला आहे पण ते घडले म्हणून अधिक कृतज्ञ आहे. गेल्या ३ वर्षात मी जवळपास २५० ऑडिशन्स दिल्या.

प्रत्येक वेळी शॉर्ट लिस्टिंगमध्ये आलो, परंतु मी यशस्वी होऊ शॅलो नाही अगदी हार मानण्याचा विचार केला. पण तुमच्या संयमाची परीक्षा घेण्याची देवाची योजना नेहमीच असते. शेवटी त्याने मला आव्हानात्मक व्यक्तिरेखा असलेली सर्वोत्कृष्ट मालिका दिली. तीही एका प्राइम चॅनलवर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंदार देवस्थळी देऊन लॉन्च केली. या संधीसाठी मी कृतज्ञ आणि आभारी आहे. तसेच सर्व कलाकार, निर्मिती टीम, दिग्दर्शन टीम, लेखक टीम, तंत्रज्ञ आणि झी मराठी ऑफिशियल सर्व मदत आणि समर्थनासाठी धन्यवाद. आम्ही पुढची भेट होईपर्यंत निरोप घेण्याची वेळ आली आहे. तोपर्यंत तुमचे प्रेम आणि साथ असेच ठेवा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.