Breaking News
Home / जरा हटके / अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा कमाल.. अभिनंदनाचा होतोय वर्षाव

अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा कमाल.. अभिनंदनाचा होतोय वर्षाव

मराठी चित्रपट सृष्टीत अलका कुबल यांनी सतत रडणाऱ्या भूमिका बजावल्या मात्र खऱ्या आयुष्यात त्या तेवढ्याच धाडसी आहेत. त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आयुष्याच्या वाटेवर असेच धाडसाचे कर्तृत्व गाजवत आहेत. अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी आठल्ये हि नुकतीच डॉक्टर झाली आहे. डॉक्टरकीसाठी लागणारी परिक्षा ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली आहे. यासाठी कस्तुरीचे अभिनंदन केले जात आहे. आपल्या लेकीचं हे यश पाहून अलका कुबल यांनी तिचं मोठं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

alka kubal family
alka kubal family

अलका कुबल यांची थोरली लेक ईशानी ही प्रोफेशनल पायलट आहे. तर आता धाकटी कन्या डॉक्टर झाली आहे. आपल्या लेकींचे हे यश अलका कुबल यांना अभिमानास्पद वाटत आहे. दोन्ही मुलींना त्यांनी कुठल्या क्षेत्रात जावं याची मोकळीक दिली होती. अलका कुबल यांनी स्वतः काही चित्रपट आणि मालिका बनवल्या होत्या. त्यातून त्यांनी आपल्या लेकींना सुद्धा या सृष्टीत लॉन्च केले असते. मात्र असे न करता त्यांनी मुलींना कोणत्याही क्षेत्रात जाण्याची मोकळीक दिली होती. त्यामुळे इशानीने बालपणीचं पायलट बनायचं स्वप्न पुढे सत्यात उतरवून दाखवलं. तर कस्तुरीने देखील आता डॉक्टर बनून आई वडिलांचे नाव लौकिक केलेलं आहे. खरी संस्कारांची शिदोरी आणि आवडी निवडीला पुरेसा वाव दिला.

alka kubal daughter kasturi
alka kubal daughter kasturi

जिद्द आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने दोन्ही मुलींनी आपापल्या क्षेत्रात यश संपादन केलेलं आहे. कस्तुरी आणि इशानी या दोघी शिक्षणासाठी परदेशात गेल्या होत्या. प्रोफेशनल पायलट बनल्यावर इशानी मायदेशी परतली होती. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच इशानीने निशांत वालिया सोबत लग्नगाठ बांधली. मागच्या महिन्यात ईशानीची पहिली संक्रात म्हणून अलका कुबल यांनी तिला साडी भेट दिली होती. इशानीच्या लग्नात कस्तुरीने सुद्धा हजेरी लावली होती. तेव्हा तिने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते. आता डॉक्टर बनून कस्तुरीने भारतात येऊन रुग्णांची सेवा करावी अशा प्रतिक्रिया अलका कुबल यांना मिळू लागल्या आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.