Breaking News
Home / मराठी तडका / निळ्याशार समुद्र किनारी अक्षया हार्दिकच्या प्रेमाला हळुवार लाटांची साथ
akshaya hardeek
akshaya hardeek

निळ्याशार समुद्र किनारी अक्षया हार्दिकच्या प्रेमाला हळुवार लाटांची साथ

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत ऑनस्क्रिन एकत्र दिसलेली हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच लग्न करणार आहे. पण त्याआधीच दापोलीतील सागरकिनारी, रानात या जोडीचा रोमान्स फुलला आहे. व्हिडिओ शेअर करत दोघांनी त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना दाखवली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रीन एकत्र दिसलेल्या जोडीला आता प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

akshaya hardeek
akshaya hardeek

मे महिन्यात साखरपुडा करून त्यांनी तुझ्यात जीव रंगला असं वचन दिलं. आता या दोघांच्या लग्नाचे वेध चाहत्यांना  लागले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि अक्षया एकमेकांच्या सहवासात भटकंतीचा आनंद लुटत आहेत. हार्दिक आणि अक्षया सध्या दापोलीमध्ये असून तेथे रानावनात भटकत ते रोमँटीक मूड शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच दापोलीतील एका मैत्रिणीने या जोडीला केळवण केले. या केळवणाचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. दापोलीत मुक्काम ठोकला असताना आता ही जोडी दापोलीतील एका मंदिरात दर्शनासाठी गेली आहे. अक्षया आणि हार्दिक यांनी हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे.

akshaya deodhar hardeek joshi dapoli
akshaya deodhar hardeek joshi dapoli

यामध्ये अक्षया निळ्या रंगाच्या साडीत खुलून दिसत आहे, तर हार्दिकनेही निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. या व्हिडिओसोबत मन रानात गेलं गं हे गाणं वाजतय. कोकणातील एका मंदिरात जाण्यासाठी दोघंही हातात हात घालून पायऱ्या चढत आहेत. गेल्याच महिन्यात ही जोडी चतुरचोर या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडन ट्रीप करून आली. या दोघांचा एकत्रित हा पहिलाच सिनेमा आहे. त्यापूर्वी हार्दिक आणि अक्षयाने कोकणातील निसर्गाचा आनंदही लुटला.  हार्दिक आणि अक्षया यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना मालिकेतही आवडली होती आणि आता प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांच्या केमिस्ट्रीवर चाहते कमेंट करत असतात.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.