Breaking News
Home / बॉलिवूड / राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल

राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल

काही दिवसांपूर्वी राखीची आई जया सावंत यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले होते. यावेळी राखी खूपच खचलेली पाहायला मिळाली. देव माझ्यासोबत असा का वागतो? असे म्हणत ती देवाला दूषणे लावत होती. आईच्या निधनानंतर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन राखी तिच्याशी बोलताना दिसली. आता तुला काही त्रास नाही ना असे म्हणत तिने आईला डोळे भरून न्याहाळले होते, त्यावेळी राखीला पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. बॉलिवूड सृष्टीतील मोठमोठाल्या सेलिब्रिटींनी राखीची भेट घेउन तीच्याशी फोनवर बोलून तिचे सांत्वन केले होते. यानंतर राखीला मिडियाने अनेकदा स्पॉट केले. त्यावेळी राखीला पुन्हा एकदा आपले अश्रू अनावर झाले होते.

adil durrani love affair
adil durrani love affair

आदिल पासून आपल्याला कोणीतरी दूर करतंय याची भीती राखीला होती. त्यासंदर्भात तिने एक मुलाखत देखील दिली होती. म्हैसूर येथील काही लोक आदिलला माझ्यापासून हिरावून नेतायेत असा आरोप तिने लावला होता. आईच्या निधनानंतर आदिलने राखीला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आता कोणीतरी मुलगी आहे जी मला आदिलपासून वेगळे करायला बघतीये, असे राखीने खुलासा करताना म्हटले आहे. राखी आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी नाही. आदिलची दुसरी एक गर्लफ्रेंड आहे असे मीडियाच्या माध्यमातून पसरवले जात आहे. त्यामुळे राखीने मीडियाचा चांगलाच समाचार घेतला आहे. माझ्या खाजगी आयुष्यबाबत अशा चुकीच्या गोष्टी पसरवू नका असे राखीने मीडियाला सुनावले आहे. चुकीच्या गोष्टी पसरवू नका, माझं ब्रेकअप झालेलं नाही.

rakhi sawant husband adil durrani
rakhi sawant husband adil durrani

आदिलने मला सोडलेलं नाही, तो आजही माझ्यासोबतच राहतो. मी फक्त आदिलच्या अफेअर्स बाबत मीडियामध्ये खबर दिली होती. फक्त त्या मुलीला समज द्यावी म्हणून मी मीडियासमोर हे बोलले होते. जी माझ्या संसारात ढवळाढवळ करतीये. ती मुलगी विवाहित आहे असेही राखी म्हणते. आदिल माझाच आहे आणि कायम माझाच राहील तेव्हा मीडियाने जरा भानावर येऊन बातम्या द्याव्यात की माझं ब्रेकअप झालेलं नाही. तो माझ्यासोबत आहे केवळ त्या महिलेला हा मेसेज देण्यासाठी असे बोलले होते. ह्या चुकीच्या बातम्या मीडियाने पसरवणे बंद करा. एवढे म्हणून राखीने मीडिया वाल्यांचा खडसावून समाचार घेतला आहे. दरम्यान आईच्या निधनानंतर आदिलने राखीची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तो सतत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.