Breaking News
Home / बॉलिवूड / अखेर आदिल दुरानीने राखी सावंत सोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन..
rakhi sawant adil durrani
rakhi sawant adil durrani

अखेर आदिल दुरानीने राखी सावंत सोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन..

राखी सावंत आणि तिची लग्न कायम चर्चेचा विषय ठरली आहेत. खरं तर राखी सावंत हिने किती लग्न केली आहेत आणि किती मोडली आहे याचा खुलासा मीडियाला अजूनही झालेला नाही. त्यामुळे राखीचं आयुष्य एखाद्या मिस्ट्रीगर्ल प्रमाणे असल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी पुन्हा एकदा चर्चेत आली. राखीची आई गंभीर आजाराशी तोंड देत असतानाच तिच्या आयुष्यात आणखी एक वादळ उठलं. राखी गेल्या काही महिन्यांपासून आदिल दुराणी सोबत रिलेशनमध्ये होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिने आदिल सोबत लग्न झाल्याचे पुरावे म्हणून लग्नाचा व्हिडीओ शेअर केला होता. आदिलसोबत सात महिन्यांपूर्वीच लग्न केलंय हा दावा तिने मिडियासमोर केला होता.

rakhi sawant adil durrani
rakhi sawant adil durrani

मात्र आदिलने हे लग्न झाले नसल्याचा बनाव केला. हे आमच्या लग्नाचे फोटो नाहीत, मी राखीसोबत लग्न केल नाही असे तो मीडियाला स्पष्ट म्हणाला. खरं तर आदिल दुसऱ्या कोणत्यातरी मुलीला डेट करतोय याची खबर राखीला लागली होती. त्यामुळे आदिलने मला फसवलं असा दावा तिने केलेला होता. पुरावा म्हणून लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सुद्धा तिने टाकले होते. हे फोटो पाहून आदिलने हे लग्न अमान्य केले, त्यामुळे राखी खूपच दुःखी झाली. आदिलने आपल्यासोबत लग्न केलंय हे त्याने नाकारले म्हणून मी खूप दुःखी आहे, असे ती सतत मीडियाला रडून सांगत होती. त्यानंतर मीडियाने आदिलशी संपर्क साधला, तेव्हा तो या गोष्टी क्लिअर करण्यासाठी मला दहा दिवसांची मुदत द्या अशी विनंती करताना दिसला. दरम्यान राखी सावंत आणि आदिल हे दोघेही एकमेकांना भेटत होते.

adil durrani rakhi sawant
adil durrani rakhi sawant

एकमेकांसोबत ते वेळ घालवताना दिसले, आमच्यात कुठलीही भांडणं नाहीत असेही दोघे मीडियाला म्हणाले होते. फक्त त्याने माझ्यासोबत लग्न झाल्याचे कबूल करावे म्हणून राखीने हा आग्रह मिडियासमोर धरला होता. यावर आता आदिलने सुद्धा मौन सोडलेलं पाहायला मिळतं आहे. नुकतेच आदिलने लग्नाचा फोटो शेअर करत राखी सोबत लग्न झालं असल्याचे जाहीर केले आहे. मीडियाला संबोधताना तो म्हणतो की, ‘तर शेवटी मी जाहीर करतो की, मी राखीशी लग्न केलेलं नाही असे कधीच म्हटले नव्हते. फक्त काही गोष्टी हाताळायच्या होत्या त्या आता मार्गी लागल्या आहेत. राखी, पप्पुडी तुला सुखी वैवाहिक जीवनच्या शुभेच्छा.’ असे म्हणत आदिलने आज राखीसोबत लग्न केल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे राखीने आणि मीडियाने सुद्धा आता निश्वास टाकला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.