Breaking News
Home / मराठी तडका / मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात..
pallavi joshi vivek agnihotri
pallavi joshi vivek agnihotri

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात..

​मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री तसेच निर्माती पल्लवी जोशी यांना अपघात झाला आहे. काल सोमवारी हैद्राबाद येथे शूटिंग चालू असताना हा अपघात घडला. पल्लवी जोशी यांना अपघातात दुखापत झाली असून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पल्लवी जोशी या हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी बालपणापासूनच अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. लवकरच त्यांचा अभिनित केलेला द वॅक्सिन वॉर हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैद्राबादला केले जात आहे.

pallavi joshi vivek agnihotri
pallavi joshi vivek agnihotri

विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या भरगोस यशानंतर त्यांनी मागील कठीण प्रसंगात वॅक्सिन बनवताना येणाऱ्या अडचणींचा लेखा जोखा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे शूटिंग हैद्राबाद येथे केले जात आहे. यात पल्लवी जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग चालू असताना एका सीनमध्ये चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडीने पल्लवी जोशी यांना धडक दिली. या अपघातात पल्लवी यांना थोडीशी दुखापत झाली आहे, मात्र तरीही चित्रपटाचे शूटिंग रखडू नये म्हणून त्यांनी त्याच अवस्थेत शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

pallavi joshi family
pallavi joshi family

दुखपतीतून रिकव्हर होताच पल्लवी जोशी पुन्हा शूटिंगसाठी परतणार आहेत. गेल्या महिन्यात द वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. कांतारा या चित्रपटाची नायिका सप्तमी सुद्धा या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढेच नाही तर या कठीण काळात ज्यांनी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते रिअल वॉरियर्स सुद्धा या चित्रपटाचा भाग असणार आहेत. ह्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे. मात्र पल्लवी जोशी यांच्या अपघातामुळे त्यांच्यावर चित्रित होणारे काही सिन पुढे ढकलण्यात आले आहेत. या अपघातातून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सुद्धा केली आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.