चंदेरी दुनियेतील प्रसिद्ध खलनायकाच्या भूमिका साकारणारे कलाकार नागेश भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात. नागेश भोसले यांना सुरुवातीच्या काळात सत्यदेव दुबे, विजया मेहता या दिग्गज कलाकारांच्या सोबत रंगभूमीवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. मराठी रंगमंचावर काम करत असताना टेलिव्हिजन जगतात अनेक मालिका आणि चित्रपट मध्ये प्रभावी भूमिका साकारल्या. चिंटू २, प्यार वाली लव्ह स्टोरी, दुनियादारी, धग, गावठी, योद्धा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा अनेक चित्रपटामधून त्यांना प्रसिद्धी मिळाली…
या मराठी चित्रपटासोबतच शूल, सरकार, क्यूँ की, डी, आखरी डिसीजन, दम, बरदाश्त यासारखे हिंदी चित्रपट अभिनित केले. त्यांनी अभिनित केलेली देवयानी मालिका खूपच लोकप्रिय झाली होती या मालिकेत त्यांनी आबासाहेब विखे पाटील यांची भूमिका गाजवली होती. बऱ्याचशा चित्रपटात त्यांनी खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे मराठी सृष्टीतील खलनायक अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. नागेश भोसले यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. पन्हाळा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगराएवढी या दर्जेदार चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या देखील मराठी सृष्टीशी निगडित आहेत. एक नाट्य निर्माती म्हणून त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. जॉय कलामांच या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी काही नाटकांची निर्मिती केली आहे. कळत नकळत, पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. एवढेच नाही तर जॉय भोसले या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.
राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या राजकारणात उतरल्या होत्या. लहानपणापासून मुंबईची झोपडपट्टी आहे तशीच आहे त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही याचं हेतूने समाजात काहीतरी बदल घडवून आणावे म्हणून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता.लोकसभा निवडणुकीत हार पत्करावी लागली असली तरी आजही त्या सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. जॉय भोसले आणि नागेश भोसले यांना दोन अपत्ये आहेत. कलाकारांची मुले कलाक्षेत्रातच येतात असा एक समज आहे मात्र त्यांची दोन्ही मुले कलाक्षेत्रापासून खूप दूर आहेत. नागेश भोसले यांनी कन्या “कुहू भोसले” ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. कुहू भोसले आपल्या फिटनेसला पहिले प्राधान्य देताना दिसत आहे. कुहू भोसले अँथलेट, वुमन्स बॉडिबिल्डिर आहे. अभिनेते नागेश भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…