Breaking News
Home / जरा हटके / ‘चविष्ट संजय राऊत रेसिपी’ कशी बनवायची.. अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल

‘चविष्ट संजय राऊत रेसिपी’ कशी बनवायची.. अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय चांगलाच चघळला जाऊ लागला आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात बंड पुकारून बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार परत शिवसेनेत यावेत म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रयत्न केले. मात्र या आमदारांनी शिवसेनेकडे कायमची पाठ फिरवली. संजय राऊत यांची आमदारांच्या बद्दलची वक्तव्ये जनतेला सर्वस्वी अमान्य होती. एकेकाळचे लोकप्रिय असलेले संजय राऊत आपल्या वक्त्यव्यांमुळे सर्वसामान्यांच्या मनातून हळूहळू उतरू लागले.

shri sanjay raut kiran mane
shri sanjay raut kiran mane

कोणीतरी त्यांना आवर घालायला हवा अशीही जोरदार टीका होताना पाहायला मिळाली. मात्र अभिनेता किरण माने यांनी त्यांच्या नावाने एक भन्नाट रेसिपी बनवली आहे. किरण माने यांची ही रेसिपी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून जनतेकडून अनेक विनोदी फटकार या पोस्टवर मारले जात आहेत. संजय राऊत बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय असेल असा प्रश्न ही रेसिपी पाहून तुम्हाला नक्कीच पडला असेल त्यासाठी किरण माने यांनी दिलेली ही रेसिपी त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात. ‘साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई दोघांपैकी जे हाताशी असेल ते वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.’

actor kiran mane
actor kiran mane

‘याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात!’. किरण माने यांनी बनवलेली ही रेसिपी पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्या या रेसिपीचं अनेकांनी कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अर्थात या भन्नाट रेसिपीमधून संजय राऊत यांच्यामध्ये नक्की कोणाकोणाचे गुण भरलेले आहेत याचे त्यांनी थोडक्यात स्पष्टीकरणच करून दिले आहे. अस्सल कोल्हापुरी बाज असलेली किरण माने यांच्या या हजरजबाबी शैलीतील रेसिपीमुळे रसिक प्रेक्षक आणि चाहते यांनी संजय राऊत यांचे भरभरून प्रशंसा केलेली पहायला मिळाले.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.