Breaking News
Home / मालिका / अबोली मालिकेत हँडसम अभिनेत्याची एन्ट्री.. मन उडू उडू झालं मालिकेत साकारली होती भूमिका

अबोली मालिकेत हँडसम अभिनेत्याची एन्ट्री.. मन उडू उडू झालं मालिकेत साकारली होती भूमिका

स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत अबोली आणि अंकुशची प्रेम कहाणी आता हळूहळू खुलू लागलेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी अबोलीला उपवास सोडायचा म्हणून अंकुश तिला मिर्ची खायला सांगून शिक्षा देतो. अबोली मिर्ची खाते त्यावेळी अंकुश देखील मिर्ची खाऊन तिची शिक्षा तो स्वतः अनुभवतो. अबोलीला जी शिक्षा देईल ती शिक्षा मी देखील अनूभवणार असा निर्णय अंकुश घेत असल्याने तो यावेळी अबोलीच्या अधिक जवळ जाताना पाहायला मिळतो. मालिकेत अंकुश आणि अबोलीची प्रेमकहाणी खुलू लागली असतानाच या मालिकेत एका डॅशिंग अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

anil rajput aboli serial
anil rajput aboli serial

हिंदी मराठी मालिका अभिनेता अनिल राजपूत ही डॅशिंग भूमिका साकारताना दिसणार आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं या मालिकेत अनिल ने छोटीशी भूमिका साकारली होती. सानिकाला पाहायला मुलगा अमितची भूमिका त्याने निभावली होती. अनिलने मालिका, चित्रपट व्यतिरिक्त जाहिरात क्षेत्रात देखील काम केले. के जी जोशी कॉलेज आणि एन जी बेडेकर कॉलेजमधून त्याने पदवीचे  शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच अनिलने विविध नाट्य स्पर्धा आणि एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. नवख्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे ‘अभिनय कट्टा’ या खुल्या व्यासपीठा अंतर्गत त्याने नाटकातून सहभाग दर्शवला.

anil rajput new serial
anil rajput new serial

प्रेमा तुझा रंग कसा, महाराष्ट्र जागते रहो, मन उडू उडू झालं अशा मराठी मालिकांमधून तो भूमिका साकारताना दिसला. पिंजरा खूबसुरती का , मेरे साईं या हिंदी मालिकेतूनही तो छोट्या पडद्यावर झळकला आहे. सागरिका म्युजिक प्रस्तुत ‘मन हे गुंतले’ या मराठी व्हिडीओ सॉंगमधून अनिल राजपूत मुख्य भूमिकेत दिसला होता. काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख यांने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले होते. रितेशच्या ‘वेड’ या आगामी मराठी चित्रपटातून अनिल राजपुतला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांने केले आहे. २२ ऑगस्ट २०२२ रोजी वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे.

या चित्रपटाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. आपल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाबाबत अनिल देखील तितकाच उत्सुक आहे. मन उडू उडू झालं या मालिकेनंतर तो अबोली या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. त्याच्या मालिकेत येण्याने अबोली आणि अंकुशच्या नात्यात दुरावा तर येणार नाही ना हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास या नवीन भूमिकेसाठी अनिल राजपुतला शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.