Breaking News
Home / मराठी तडका / आयुषच्या आजोबांचे दुःखद निधन.. मिस यु आबा, आता आपण पुन्हा कधीच

आयुषच्या आजोबांचे दुःखद निधन.. मिस यु आबा, आता आपण पुन्हा कधीच

कलर्स मराठी वरील योग योगेश्वर जयशंकर या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मालिकेतील बाल शंकर महाराजांच्या भूमिकेत झळकलेला आरुष या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. मालिकेने अनेक वर्षांची लीप घेतली आहे. त्यामुळे ही भूमिका आता संग्राम समेळ निभावत आहे. आरुषने काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतलेला होता. मालिकेतून निरोप घेतल्यानंतर आयुष्य आपल्या शालेय अभ्यासाकडे वळला. नुकतेच आयुषने त्याच्या आजोबांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

aarush bedekar shankar maharaj
aarush bedekar shankar maharaj

आजोबा सोबत आयुषचे नाते खूप घट्ट होते त्यामुळे आबांच्या निधनाने तो खूपच भावुक झाला आहे. मिस यु आबा, आता आपण कधीच असा एकत्र फोटो काढू शकणार नाही. ही खंत त्याने यावेळी व्यक्त केली आहे. त्याच्या या बातमीने कलाकारांनी आणी चाहत्यांनी भावुक होऊन श्रद्धांजली वाहिली आहे. योग योगेश्वर जयशंकर या मालिकेच्या कलाकार टीम सोबत आयुषचे छान सूर जुळले होते. केवळ कलाकार टीमच नव्हे तर अगदी बॅक आर्टिस्टची सुद्धा आयुषसोबत चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे मालिकेला निरोप देताना ही सर्व मंडळी खूपच भावुक झाली होती. आरुषचे कुटुंबीय अहमदनगर येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील प्रसाद बेडेकर हे सुद्धा या मालिकेत अभिनय करताना दिसले होते.

aarush bedekar grandfather aaba
aarush bedekar grandfather aaba

याशिवाय नगर जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या  सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. आयुषची आई अमृता बेडेकर या देखील गायिका आहेत. त्यामुळे आरुषला कलेचा हा वारसा घरातूनच मिळालेला होता. शाळेतील विविध नाटकांमधून आरुष महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. अशातच त्याला पहिल्यांदा या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. आपल्या आजोबांसोबत मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ तो नेहमी शेअर करायचा, त्यामुळे आजोबांच्या निधनाने आरुष पूर्णपणे खचलेला पाहायला मिळतो आहे. या दुःखातून त्याला सावरण्यास बळ मिळो हीच सदिच्छा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.