Breaking News
Home / मालिका / आईच्या मायेपुढे मानसिंग वकील टिकतील का?
aai mayeche kavach serial
aai mayeche kavach serial

आईच्या मायेपुढे मानसिंग वकील टिकतील का?

सध्या मराठी मालिकांच्या केंद्रस्थानी आई आणि मुलगी हा बिंदू असल्याचं पहायला मिळतंय. जगातील एक सुंदर नातं म्हणजे आई मुलीचं. याच नात्यातील पदर उलगडून दाखवणारी आई, मायेचं कवच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत कोर्टामध्ये मुलगी सुहानीला न्याय मिळवून देण्यासाठी तिची आईच वकील बनून युक्तीवाद करताना दिसत आहे. पण सुहानी विरोधातील पुराव्यांच्या आधारे तिच्यासमोर उभा असलेला वकील मानसिंगचा टिकाव एका आईच्या मायेपुढे लागणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. आई मीनाक्षी आणि मुलगी सुहानी यांच्या नात्याची ही गोष्ट आहे. मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुहानीला शोधण्यासाठी मीनाक्षीने जीवाचे रान केले होते.

aai mayeche kavach serial
aai mayeche kavach serial

आता ती जेव्हा सापडली तेव्हा मीनाक्षीचा संघर्ष संपलेला नाही. सुहानीची सध्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच पोलिसांच्या तपासणीत सुहानीच्या बेडरूममधील कपाटात केमिकल्सच्या बाटल्या सापडल्या. तिनेच इतर मुलींना केमिकल्सची सवय लावली आणि सुहानीमुळेच ऋचाने आत्महत्या केल्याचा आरोप ठळक झाला. सुहानी वर कोर्टात केस उभी राहिल्याने आई मीनाक्षी समोरील अडचणी वाढल्या होत्या. त्यातच मीनाक्षीने आपल्या कुटुंबाला त्रास दिल्याच्या अढीतून तिचा वचपा काढण्यासाठी मानसिंग वकीलानेही कट कारस्थानं करण्यास सुरूवात केली आहे. अशा रंजक वळणावर सध्या आई मायेचं कवच ही मालिका आली आहे.

bhargavi chirmuley varad chavan anushka pimputkar
bhargavi chirmuley varad chavan anushka pimputkar

येत्या काही एपिसोडमध्ये या मालिकेत कोर्ट सीन दिसणार आहेत. सुहानी निर्दोष आहे हे आई मीनाक्षीला माहित आहे. तिच्याविरोधात पुरावे निर्माण केले जात आहे हे ओळखूनच आई नव्हे तर आता वकील बनून मीनाक्षी वकील मानसिंग यांच्यासमोर उभी राहिली आहे. मात्र मानसिंग वकीलाने खोटे पुरावे तयार करून मीनाक्षीला टक्कर द्यायचे ठरवल्याने मीनाक्षी आता काय नवं अस्त्र बाहेर काढणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. इन्स्पेक्टर लोखंडे यांची साथ मीनाक्षीला आहे. पण एकीकडे मुलीला न्याय मिळवून देण्याचा ध्यास आणि दुसरीकडे गुप्तशत्रूंनी वर काढलेलं डोकं यामध्ये मीनाक्षीतील मातृत्व मात करू शकेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मीनाक्षीच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले हीने अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम याची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली. तो वकील मानसिंग यांच्या भूमिकेत आहे. वरद चव्हाणने लोखंडे इन्स्पेक्टरच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. मालिकेत आई मुलीच्या प्रेमासोबतच एक गूढ रहस्यही दडलेलं आहे. त्या रहस्याची उत्सुकता टिकवण्यात मालिकेने यश मिळवलं आहे. उत्तम कलाकारांच्या सोबतीला दमदार स्क्रिप्ट प्रेक्षकांच्या अपेक्षांना पात्र ठरताना दिसत आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.