गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. नुकतेच आशुतोषने अरुंधतीला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र हे दोघे लग्न कधी करणार याकडे लक्ष्य लागून राहिले आहे.

तूर्तास गौरी परदेशात जाणार की नाही यावर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.पण गौरी जर परदेशात निघून गेली तर यशला करमणार नाही हे अरुंधती त्याच्याजवळ बोलून दाखवते. मात्र गौरी परदेशात जावी आणि तिचे ध्येय्य साध्य करावे अशी यशची देखील ईच्छा आहे. मालिकेच्या आजच्या भागात या सर्व घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. ईशा आणि यश अरुंधतीच्या घरी येतात आणि तिला ऑनलाइन पिझ्झा कसा ऑर्डर करायचा हे शिकवतात. परंतु एवढा सगळा पिझ्झा कोण खाणार म्हणून ईशा अनघाला फोन लावते. अनघा ईशासोबत फोनवर बोलत असते. तेवढ्यात अंधाऱ्या खोलीत संजना बेशुद्ध पडल्याचे तिला समजते.

त्यामुळे घाबरून ती घरातील सगळ्यांना हाका मारते. अनघाचे ओरडणे ऐकून अरुंधती देशमुखांच्या घरी येते. गेल्या काही दिवसांपासून संजनाने तिच्या नावावर घर करून घेताच अनिरुद्धचा विरोध तिला सहन करावा लागत आहे. मात्र अनिरुद्ध आपल्याशी बोलत नाही हे संजनाला त्रासदायक ठरू लागले आहे. याच कारणास्तव संजना झोपेच्या गोळ्या खाते. ती अरुंधतीला हात जोडून विनंती करते की, काहीही करून तू अनिरुद्धला समजावून सांग मी त्याच्यासाठी सर्व काही सोडून आलेली आहे. संजनाच्या या विनंतीवर अरुंधती आता पुढे काय निर्णय घेणार. ती अनिरुद्धला समजावण्याचा प्रयत्न करणार की नाही, हे मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे.