Breaking News
Home / मालिका / नकळतपणे अरुंधती देणार ​आशुतोषच्या प्रेमाची कबुली.. अनिरुद्ध होणार निशब्द

नकळतपणे अरुंधती देणार ​आशुतोषच्या प्रेमाची कबुली.. अनिरुद्ध होणार निशब्द

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. नितीनच्या गाडीचा अपघात घडून येतो त्यात आशुतोषला गंभीर दुखापत होते. बेशुद्धावस्थेत असून जर लवकर शुद्धीत आला नाही तर कोमात जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीची आशुतोषबद्दल असलेली काळजी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशुतोषला झालेल्या ऍक्सिडंट मुळे अरुंधतीची घालमेल मधुराणी प्रभुळकर हिने आपल्या अभिनयाने सुरेख निभावली आहे. काही दिवसांपूर्वीच आशुतोषने अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. ऍक्सिडंटमुळे मात्र अरुंधती नकळतपणे त्याच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे.

aai kuthe kay karte serial
aai kuthe kay karte serial

मालिकेच्या पुढच्या भागात अरुंधती अनिरुद्धसोबत बोलत असते, त्यावेळी तो तिला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र अरुंधतीची घालमेल तो प्रत्यक्षात अनुभवत असतो. त्यात अरुंधतीचे बोलणे अनिरुद्धला निशब्द करून टाकतात. ती नकळतपणे बोलून जाते की, एवढं सगळं अस्थिर गोंधळाचं असताना आपलं डोकं शांत राहण्यासाठी आपल्याला एक जागा हवी असते ना. ती जागा म्हणजे आशुतोष आहेत माझ्यासाठी. ती गमवायची नाहीये मला, ते असायला हवेत या जगात, माझ्या आयुष्यात.’ अरुंधतीचे हे बोलणे अनिरुद्धच्या मनाला चटका लावून जातात. अरुंधती आशुतोषच्या प्रेमात गुंतली आहे हे अनिरुद्धला कळू लागले आहे. त्यामुळे अनिरुद्ध आता अरुंधतीच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता अधिक आहे.

aai kuthe kay karte
aai kuthe kay karte

एकीकडे संजनाच्या वागण्यामुळे अनिरुद्ध आपल्या कुटुंबापासून दुरावत चालला होता. मात्र संजनाचे सत्य आता हळूहळू त्याला उलगडायला लागले आहे. तिच्यामुळे आपली मुलं घर सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र मी आता कमवू लागलो आहे आणि आपण हे राहतं घर वाढवू असे तो अभिषेकला समजावून सांगत आहे. संजनाच्या कारस्थानामुळे अनिरुद्ध दूर राहताना दिसत आहे. त्यात आता अरुंधती देखील आशुतोषच्या प्रेमात अडकली असल्याचे त्याला कळून चुकले आहे. मात्र आशुतोषवरील असलेल्या अरुंधतीच्या प्रेमाला तो कसा स्वीकारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. येत्या काही भागात मालिकेत येणारा हा ट्विस्ट अनिरुद्धची घालमेल प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.